या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशात गुरुवारी एकाच दिवशी जवळपास १४ लाख लोकांचे कोविड-१९ लसीकरण करण्यात आले असून आतापर्यंतचा हा उच्चांक आहे.

गुरुवारी लसीकरणाच्या ४८व्या दिवशी १३ लाख, ८८ हजार, १७० जणांचे लसीकरण करण्यात आले. एका दिवसातील हा उच्चांक आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

गुरुवारी १० लाख, ५६ हजार, ८०८ जणांना लशीची पहिली मात्रा देण्यात आली तर आरोग्यक्षेत्र आणि कोविडयोद्धे मिळून तीन लाख, ३१ हजार, ३६२ जणांना लशीची दुसरी मात्रा देण्यात आली, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

* देशात आतापर्यंत एकूण १.८ कोटी लोकांचे कोविड-१९ लसीकरण करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली.

* यामध्ये ६८ लाख, ५३ हजार, ०८३ जण आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी असून त्यांना लशीची पहिली मात्रा देण्यात आली आहे तर ३१ लाख, ४१ हजार, ३७१ कर्मचाऱ्यांना लशीची दुसरी मात्रा देण्यात आली आहे.

* ६० लाख ९० हजार, ९३१ करोनायोद्धय़ांना लशीची पहिली मात्रा देण्यात आली आहे, तर ६७ हजार, २९७ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे.

* सहव्याधी असलेल्या आणि ४५ हून अधिक वय असलेल्या दोन लाख, ३५ हजार ९०१ लाभार्थ्यांना लशीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.

* ज्यांचे वय ६० वर्षांहून अधिक आहे अशा १६ लाख, १६ हजार, ९२० जणांना मात्रा देण्यात आली आहे. गुरुवारी जवळपास १४ लाख मात्रा देण्यात आल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaccination of one crore 80 lakh people abn
First published on: 06-03-2021 at 00:22 IST