देशात सध्या करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु आहे. मात्र गेल्या काही काळापासून लसीकरणाचा वेग मंदावल्याचं चित्र दिसून येत आहे. याच गतीने जर लसीकरण होत राहिलं तर देशाचं लसीकरणाचं लक्ष्य गाठणं अवघड होणार असल्याचं चित्र दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जुलै महिन्यात १३ कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरण करण्याचं लक्ष्य देशासमोर आहे. मात्र, या महिन्याभरात म्हणजे गेल्या रविवारपर्यंत ९.९४ कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. म्हणजे सरासरी प्रतिदिन ३८.२६ लाख डोस. जर याच गतीने लसीकरण सुरू राहिलं तर जुलै महिना संपेपर्यंत देशात १२.५ कोटी डोस दिले जातील. जर या महिन्याचं १३ कोटींचं लक्ष्य पूर्ण करायचं असेल तर प्रतिदिन सरासरी ६० लाख डोस देणे आवश्यक आहे. मात्र, हा आकडा या महिन्यात केवळ दोन वेळा गाठला आहे.

हेही वाचा – करोनाचा वेग मंदावतोय?; चार महिन्यानंतर पहिल्यांदाच सापडले इतके कमी करोनारुग्ण

१८ वर्षांवरील सर्वांच्याच लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून म्हणजे २१ जूनपासून लसीकरणाचा वेग मंदावल्याचं चित्र आहे. त्याच वेळी जुलै महिन्याच्या १३. ५ कोटी लसीकरणाच्या लक्ष्याची घोषणा करण्यात आली होती. अधिकृत माहिती असं दर्शवते की, जूनच्या शेवटच्या आठवड्यात लसीच्या साप्ताहिक डोसची संख्या सर्वाधिक म्हणजे ४.८ कोटी होती, मात्र २५ जुलैला संपणाऱ्या आठवड्यामध्ये हे प्रमाण २.८ कोटींवर आलं आहे. मात्र, जुलैपर्यंतच्या २७ आठवड्यांच्या सरासरी प्रमाणापेक्षा हे प्रमाण नक्कीच जास्त आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासांत २९ हजार ६८९ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ४१५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ४२ हजार ३६३ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत.यापूर्वी देशात सोमवारी ३९ हजार ३६१ आणि रविवारी ३९ हजार ७४२ नवीन करोना रुग्ण आढळले होते. त्यामुळे आजची आकडेवारी दिलासादायक आहे. तसेच देशात सक्रिय रुग्णसंख्येतही घट झाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaccination pace drops july target likely to be missed vsk
First published on: 27-07-2021 at 10:44 IST