संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वीर सावरकर यांच्याबद्दल काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर काहींनी त्यांचं समर्थन केलं तर त्यांना टीकेला देखील सामोरं जावं लागलं. नुकत्याच एका टीव्ही शोच्या डिबेटमध्ये पुन्हा सावरकर चर्चिले गेले. या कार्यक्रमात एमपीसीआयचे अध्यक्ष तस्लीम रहमानी, भाजपा नेते सुधांशू त्रिवेदी, काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम आणि पत्रकार उदय माहुरकर यांच्या शाब्दिक वाद झाला. माहूरकर आणि आचार्य प्रमोद यांनी एकमेकांवर सडकून टीका केली.

एमपीसीआयचे अध्यक्ष तस्लीम रहमानी यांनी काँग्रेसला सवाल केला की, काँग्रेस हिंदुत्वासाठी लढत होती की स्वातंत्र्यासाठी हा खरा चर्चेचा विषय आहे. यावर पत्रकार उदय माहूरकर म्हणाले की, या व्यासपीठाचा वापर करून हे माईंड वॉश करण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले, ‘तुम्ही इतिहास बदलण्याचा प्रयत्न करत आहात, उदय जी, मी इतिहास स्वीकारत आहे. मी सावरकरांचे योगदान मान्य करत आहे. तुम्ही त्यांची दया याचिका स्वीकारत नाही का?’ असा सवाल केला.

या प्रश्नावर, उदय माहूरकर ओरडून म्हणाले, ‘नाही, मी स्वीकारत नाही.’ दरम्यान काँग्रेसचे नेते माहूरकरांना विचारतात की, ‘सावरकरांनी दयेचा अर्ज लिहिला नाही असे तुम्हाला म्हणायचे आहे का?’ यावर उदय म्हणतात, सावरकराचा तुम्ही गांधींसारखा विचार करू शकत नाही. तर, आचार्य प्रमोद म्हणतात ‘मी सावरकरांचे योगदान स्वीकारत आहे, तुम्ही तो इतिहास स्वीकारत नाही.’ यावर, उदय म्हणतात ‘तुम्ही सावरकरांच्या विरोधात आहात कारण सावरकरांची मागणी वाढली आहे.’ काँग्रेस नेते आचार्य प्रमोद यावर प्रतिक्रिया देतात आणि म्हणतात- ‘हा मुर्खपणा असून मी तुमच्याशी अजिबात सहमत नाही.’

अचानक उपस्थित पाहुण्यांमध्ये जोरदार वाद सुरू होतो आणि अँकर अमिश देवगण त्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात.