ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये आणखी एक हिंसक घटना घडली आहे. येथील एका मशिदीबाहेर एका गाडीने अनेक पादचाऱ्यांना चिरडले. या घटनेत अनेक लोक जखमी झाले आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याचा वृत्तास पोलिसांनी दुजोरा दिला आहे. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास फिन्सबरी पार्क येथील एका मशिदीतून नमाज पठण करून मोठ्याप्रमाणात लोक बाहेर पडले होते. त्याचवेळी एका कारने पायी चालत जात असलेल्या लोकांना चिरडले. त्या व्यक्तीने जाणूनबुजून मुस्लिमांना लक्ष्य केल्याचे काहींनी सांगितले. परंतु, पोलिसांनी याला दुजोरा दिलेला नाही. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. सध्या रमजानचा महिना सुरू आहे. यापूर्वी ३ जून रोजी ३ हल्लेखोरांनी लंडनमध्ये दोन जागांवर हल्ले केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही जणांनी हा हल्ला मुस्लिम वेल्फेअर हाऊसच्या बाहेर झाल्याचे म्हटले. पण त्याचवेळी अनेक लोक फिन्सबरी पार्क येथील मशिदीतून बाहेर पडत होते. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. रमजान फाऊंडेशन मुस्लिम ऑर्गनायझेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहम्मद शफिक म्हणाले, प्रत्यक्षदर्शीच्या मते निर्दोष मुसलमानांना जाणूनबुजून निशाणा बनवले होते. जर प्रशासनाने यास दुजोरा दिला तर याला दहशतवादी हल्ला म्हणून घोषित केले पाहिजे.

मेट्रोपोलिटन मेजिस्ट्रेटने ही मोठी घटना असल्याचे म्हटले आहे. ज्या व्यक्तीने हे कृत्य केले. त्याला अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ‘गार्डियन’ने दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान मे यांनी ही भयावह घटना असल्याचे म्हटले आहे. दहशतवादविरोधी पथकाकडून या घटनेचा तपास केला जात आहे. एका प्रत्यक्षदर्शीने या दुर्घटनेत किमान १० लोक जखमी झाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vehicle hits pedestrians in london finsbury park mosque one dead several wounded one arrested
First published on: 19-06-2017 at 13:37 IST