Venomous snake dies 5 minutes after biting man : मध्यप्रदेशमध्ये गुरूवारी सकाळी एक अत्यंत दुर्मिळ घटना समोर आली आहे. येथील बालगाट जिल्ह्यातील एका व्यक्तीला एक विषारी साप चावला आणि विशेष बाब म्हणजे चावा घेतल्यानंतर अवघ्या पाचच मिनिटांत त्या सापाचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल प्रदेशात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ही गटना बालाघाट जिल्ह्यातील खुडसोदी गावात घडली. सध्याच्या घडीला साप ज्या व्यक्तीला चावला तो धोक्याच्या बाहेर आहे आणि त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील पीडित व्यक्तीचे नाव सचिन नागपुरे असून त्याचे वय २५ वर्ष आहे. हा व्यक्ती कार मेकॅनिक म्हणून काम करतो. गुरूवारी सकाळी ७ वाजता तो त्याच्या शेतात गेला होता, यावेळी त्याने चुकून सापाच्या अंगावर पाय दिला, त्यामुळे सापाने त्याला दंश केला. पण चावा घेतल्याच्या अवघ्या ५ ते ६ मिनिटांत त्या सपाचा मृत्यू झाला. प्रकाराने सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला. फ्री प्रेस जर्नलने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं?

तज्ज्ञांच्या मते, एखाद्या व्यक्तीला चावल्यानंतर सापाचा मृत्यू होणे हे अत्यंत दुर्मिळ आहे. हे एक विचित्र प्रकरण आहे. यासाठी अनेक कारणे असू शकतात.

दरम्यान सचिनने सांगितेले की तो गेल्या ७-८ वर्षांपासून वेगवेगळ्या झाडांची फांद्या वापरून दात घासत आला आहे, ज्यामध्ये चिडचिडीया, पिसुंदी, पुल्सा, जांभळ, आंबा, तौर, आजन, कारंजी आणि कडुनिंब यांचा समावेश आहे. त्याचं असं म्हणणं आहे की या औषधी वनस्पतींच्या लाकडाच्या मिश्रणामुळे त्याच्या रक्तात सापासाठी विषारी ठरेल असं काहीतरी तयार झालं असू शकतं.

वन विभागाचे रेंजर धर्मेंद्र बिसेन म्हणाले की ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना आहे. त्यांनी स्पष्ट केले की एखाद्या व्यक्तीला चावल्यानंतर सापाचा मृत्यू अगदी असामान्य परिस्थितीतच होऊ शकतो. अशीच एक शक्यता अशी आहे की, चावल्यानंतर जर सापाची विषाची पिशवी मुरगळली गेली तर ती अचानक फुटू शकते, ज्यामुळे सापाचा जागेवर तत्काळ मृत्यू होऊ शकतो.

साप अत्यंत विषारी होता

साप चावल्याची घटना घडल्यानंतर त्या व्यक्तीने त्याच्या कुटुंबियांना याबद्दल माहिती दिली. त्यानंतर कुटुंबातील सदस्य घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ते सापाला बरोबर घेऊन रुग्णालयता गेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान या व्यक्तीच्या कुटुंबियांनी सांगितले की, जो साप चावला तो साधारण नव्हत तर तो डोंगारबेलिया (Dongarbelia) साप होता. हा साम अत्यंत विषारी असतो.