इराकच्या राष्ट्राध्यक्षपदी बरहम सालेह हे विजयी झाले आहेत. मंगळवारी रात्री उशिरा त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पेट्रिऑटिक यूनियन ऑफ कुर्दिस्तानचे (पीयूके) उमेदवार असलेल्या सालेह यांनी कुर्दिस्तान डेमोक्रॅटिक पक्षाचे (केडीपी) उमेदवार फुआद हुसेन यांचा पराभव केला. ५८ वर्षीय बरहम सालेह यांना २१९ तर फुआद यांना २२ मते मिळाली. बरहम सालेह हे इराकचे आठवे राष्ट्राध्यक्ष असतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन्ही पक्षांमध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी मोठी रस्सीखेच होती. परंतु, निकाल एकतर्फी लागला. तसेच निकाल लागण्यासही उशीर झाला. २००३ नंतर इराकमध्ये राष्ट्राध्यक्षपदी कुर्द निवडून येत आहेत. पंतप्रधान शिया मुसलमान आणि संसदेचे सभापती सुन्नी समाजाचे आहेत. इराकची अखंडता आणि सुरक्षेसाठी काम करणार असल्याचे सालेह यांनी शपथग्रहणावेळी म्हटले. सरकार स्थापन करण्यासाठी नव्या राष्ट्राध्यक्षांकडे १५ दिवसांची कालावधी असेल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran kurdish leader barham salih has been elected as the president of iraq
First published on: 03-10-2018 at 03:35 IST