विश्व हिंदू परिषदेकडून काल(शनिवार) कुतुबमिनार संकुलातील प्राचीन मंदिरांची पुनर्बांधणी करून, तेथे हिंदू विधी आणि प्रार्थना पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे.

विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल आणि संघटनेच्या अन्य नेत्यांनी कुतुबमिनार परिसराला भेट दिल्यानंतर वरील मागणी केली आहे. आम्ही प्रमुख भागांची पाहणी केली आणि हिंदू देवी-देवातांच्या मूर्तींची अवस्था मन हेलवणारी होती. कुतुबमिनारला २७ मंदिरांना उध्वस्त केल्यानंतर मिळालेल्या साहित्याने बनवले गेले होते.

त्यामुळे “आधी पाडलेली सर्व २७ मंदिरे पुन्हा बांधण्यात यावी आणि हिंदूंना तेथे पूजा करण्याची परवानगी द्यावी, अशी आमची मागणी आहे,” असे ते म्हणाले.

प्राचीन मंदिरांची पुनर्बांधणी व्हावी –

येथील शिल्पकला आणि भारतीय संस्कृतीची झलक अप्रतिम असल्याचे विनोद बन्सल यांनी सांगितले. पण त्याला विकृत केले गेले, आता ते दुरुस्त करणे आवश्यक आहे. मंदिरांची पुनर्बांधणी करून तेथे पूजा करण्याची परवानगी द्यावी. असं बन्सल म्हणाले आहेत.