दिल्लीत चालत्या बसमधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील एकमेव साक्षीदार असणाऱ्या पीडित मृत तरुणीच्या मित्राने मंगळवारी साक्ष देण्यासाठी जलदगती न्यायालयात हजेरी लावली. सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेला पीडित मृत तरुणीचा हा २८ वर्षीय मित्र व्हील चेअरवरून अतिरिक्त सत्र न्या. योगेश खन्ना यांच्यासमोर हजर झाला.
गेल्या वर्षी १६ डिसेंबर रोजी आपल्या मित्रासोबत प्रवास करणाऱ्या २३ वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये सहा जणांनी अमानुषपणे अत्याचार केला होता. या वेळी तिच्यासह तिच्या मित्रालाही आरोपींनी अमानुषपणे मारहाण केली होती. या प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला सुरू असून २ फेब्रुवारी रोजी या गुन्ह्य़ातील पाच आरोपींविरोधात अपहरण, बलात्कार, खून, दरोडा आदी गुन्ह्य़ांसाठी आरोपपत्र दाखल केले आहे.
या प्रकरणी न्यायालयाने मृत तरुणीच्या मित्रासह अन्य तिघांना साक्षीसाठी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मृत तरुणीच्या मित्राने आज न्यायालयात हजेरी लावली.
संग्रहित लेख, दिनांक 6th Feb 2013 रोजी प्रकाशित
पीडित मृत तरुणीचा मित्र न्यायालयात हजर
दिल्लीत चालत्या बसमधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील एकमेव साक्षीदार असणाऱ्या पीडित मृत तरुणीच्या मित्राने मंगळवारी साक्ष देण्यासाठी जलदगती न्यायालयात हजेरी लावली. सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेला पीडित मृत तरुणीचा हा २८ वर्षीय मित्र व्हील चेअरवरून अतिरिक्त सत्र न्या. योगेश खन्ना यांच्यासमोर हजर झाला.
First published on: 06-02-2013 at 05:06 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Victimed dead lady frient present in court