बंगळुरू शहरात गुरूवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला . बेंगळुरू विमानतळाच्या परिसरातील एस्टीम मॉलजवळ भरधाव वेगात असणाऱ्या  वॉटर टँकरने रस्त्यावरील एक पादचारी आणि एका बाईकस्वाराला चिरडले. येथील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये या भीषण घटनेचा संपूर्ण थरार कैद झाला. पोलीसांच्या माहितीनूसार, एस्टीम मॉलच्याजवळ गुरूवारी दुपारी १२.४५च्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. पादचाऱ्यांनी गजबजललेल्या या परिसरात वाहनचालक मात्र नेहमी सिग्नलकडे दुर्लक्ष करताना दिसतात. त्यामुळे या ठिकाणी नेहमी अपघात होण्याची टांगती तलवार असते. नेमकी हीच परिस्थिती या अपघाताला कारणीभूत ठरली. या अपघात मृत्यू  झालेल्यांमध्ये कर्नाटकचे माजी आमदारांची कन्या अर्पिता (२०) आणि एका खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याचा समावेश आहे.