पाकिस्तानकडून सीमा रेषेवर कुरापती करणे सुरूच आहे. वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन व घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याकडून आज देखील एलओसीवरील जम्मू-काश्मीरमधील नौशारा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार करण्यात आला. यास भारतीय जवानांनी देखील सडेतोड प्रत्युत्तर दिले. मात्र, यावेळी झालेल्या गोळीबारात भारतीय सैन्य दलातील नायब सुभेदार राजविंदर सिंग हे शहीद झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानी सैन्याशी लढत असताना नायब सुभेदार राजविंदर सिंग यांना गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. यानंतर उपचारा दरम्यान ते शहीद झाले. भारतीय लष्कराचे पीआरओ लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी याबाबत माहिती दिली. नायब सुभेदार राजविंदर सिंग हे अतिशय शूर व देशाच्या रक्षणासाठी समर्पित असे सैनिक असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, श्रीनगरमधील पंथा चौक परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. तर, त्या ठिकाणी देखील एक जवान शहीद झाला आहे. काल रात्रीपासून या परिसरात चकमकीस सुरूवात झाली होती.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Violation of arms embargo by pakistan deputy subhedar martyred msr
First published on: 30-08-2020 at 15:01 IST