पश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या दिवशी अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं आहे. यावरून भाजपा आणि तृणमूल काँग्रेस ( टीमएमसी ) मध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. यातच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दंगल प्रकरणी जबाबदार असणाऱ्यांना अद्दल घडवणार असल्याचा इशारा दिला आहे. ही आपल्या राज्याची संस्कृती नाही, असेही ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.

पुरबा मेडिनीपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बॅनर्जी म्हणाल्या, “बाम ( डावे ) आणि राम ( भाजपा ) आमच्याविरोधात एकत्र आले आहेत. रामनवमीदिवशी हिंसाचार करून भाजपा रामाचे नाव बदनाम करत आहे.”

हेही वाचा : कर्नाटकात रोड शो वेळी ५०० च्या नोटा उधळणे डीके शिवकुमार यांना पडलं महागात, न्यायालयाने दिले ‘हे’ निर्देश

“हुगळी आणि हावडा येथील दंगलीमागे भाजपाचा हात आहे. बंगालमध्ये दंगल घडवण्यासाठी अन्य राज्यांतून ‘गुंड’ आणले होते. एका समाजाला दुसऱ्या समाजाविरुद्ध उभे करत हिंदू धर्माला बदनाम करण्यात येत आहे. दंगल करणाऱ्यांना धर्म नसतो, ते फक्त राजकीय पक्षाचे ‘गुंड’ असतात. सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन करते,” असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं.

हेही वाचा : ताकदवान भ्रष्टाचाऱ्यांवर न भिता कारवाई करा! सीबीआय अधिकाऱ्यांना पंतप्रधानांचा ‘सल्ला’;संस्थेच्या हीरक महोत्सवात विरोधकांवर टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिहारमध्ये भाजपा सत्तेत आल्यावर दंगलखोरांना उलटे टांगू, असं गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं होतं. याचा दाखला घेत ममता बॅनर्जींनी सांगितलं, “बिहारमध्ये पक्ष सत्तेवर आल्यावर दंगलखोरांना उलटे टांगू, असं भाजपाने म्हटलं. मग बंगालमध्ये दंगल घालणाऱ्या तुमच्या गुंडांना उलटे का टांगत नाही? आपल्या घरातूनच कारवाईला सुरुवात व्हावी.”