महाचक्रीवादळ अम्फनने रौद्र रूप धारण केले असून पश्चिम बंगालमध्ये ताशी १९० कि.मी वेगाने प्रवेश केला आहे. या चक्रीवादळाने पश्चिम बंगाल व ओडिशामधील १२ जणांचा बळी घेतला आहे. अम्फन वादळामुळे पश्चिम बंगाल व ओडिशाच्या किनारी भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला असून मोठं नुकसान झाले आहे.

पश्चिम बंगालमधील दिघा व बांगलादेशातील हातिया या प्रदेशांना बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास तडाखा दिला. त्यानंतरच्या झंझावातात अनेक झाडे, घरे उन्मळून पडली असून विद्युत खांबही कोसळले आहेत. या चक्रीवादळचे रौद्र रुप दाखवणारे अनेक व्हिडिओ ट्विटवर व्हायरल झाले आहेत.

शहरात पाणी साचले…

बसही उलट जाऊ लागली

मोठे मोठे ट्रकही उलटले

वादळी वारे

विजेचे खांबही पडले…

घराची छप्परे उलटली

सोसाट्याचा वारा…

नारळाच्या झाडावर पडली वीज

सुसाट वाहणारे वारे…

जोरदार वारे…

नुसता वारा आणि पाऊस

विजांचा कडकडाट…

छप्परच उडून गेले

यावरुन वादळाचा अंदाज येतो…

वादळानंतर…

सुमारे ६ लाख ५८ हजार लोकांना दोन राज्यात सुरक्षित ठिकाणी हलवले असून वादळाचा वेग सुरुवातीला ताशी १६०-१७० किमी होता तो नंतर १९० कि.मी झाला.