भारतातील किराणा व्यापारक्षेत्रात शिरकाव करण्यासाठी सव्वाशे कोटी रुपये खर्च करणाऱ्या वॉलमार्टच्या लॉबिंग प्रकरणाचे तीव्र पडसाद संसदेत मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही उमटले. या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा लोकसभेत संसदीय कामकाज मंत्री कमलनाथ यांनी केली. पण, वॉलमार्ट प्रकरणी देशाची प्रतिष्ठा पणाला लागली असून, त्याची न्यायालयीन किंवा संयुक्त संसदीय समितीद्वारे कालबद्ध चौकशी करून सत्य देशापुढे मांडले पाहिजे, अशी मागणी करीत विरोधकांनी गोंधळ घालून लोकसभेचे कामकाज बंद पाडले.
सभागृहाचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी, सोनिया गांधी यांच्या इशाऱ्यावरून कमलनाथ यांना या प्रकरणी चौकशीची घोषणा करण्याचे निर्देश दिले. कमलनाथ यांनी तशी घोषणाही केली. पण या घोषणेमुळे विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यांनी सरकार आणि वॉलमार्ट निषेधाच्या घोषणा देत गोंधळ सुरुच ठेवल्याने अध्यक्ष मीराकुमार यांना लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यास भाग पडले.
संग्रहित लेख, दिनांक 11th Dec 2012 रोजी प्रकाशित
वॉलमार्ट प्रकरणी संसदेत तीव्र पडसाद; चौकशी’साठी सरकार तयार
भारतातील किराणा व्यापारक्षेत्रात शिरकाव करण्यासाठी सव्वाशे कोटी रुपये खर्च करणाऱ्या वॉलमार्टच्या लॉबिंग प्रकरणाचे तीव्र पडसाद संसदेत मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही उमटले. या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा लोकसभेत संसदीय कामकाज मंत्री कमलनाथ यांनी केली.

First published on: 11-12-2012 at 07:36 IST
TOPICSवॉलमार्ट
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Walmart lobbying disclosure govt ready for inquiry