”कोणताही भारतीय हा दिवस विसरू शकत नाही. दोन वर्ष अगोदर आजच्याच दिवशी पुलवामा हल्ला झाला होता. आम्ही त्या सर्व शहिदांना श्रद्धांजली अर्पण करतो, जे या हल्ल्यात शहीद झाले होते. आम्हाला आपल्या जवानांचा अभिमान आहे, त्यांच्या शौर्याने अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळत राहील.” अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) पुलवामामधील शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. चैन्नई येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याला आज दोन वर्ष झाले आहेत. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. ज्यामध्ये ४० जवान शहीद झाले होते.

पुलवामाच्या स्मृतीदिनी घातपाताचा कट उधळला; बस स्टॅण्डजवळ सापडले स्फोटक साहित्य

दरम्यान, पुलवामा हल्ल्याच्या स्मृतीदिनी आज(रविवार) पुन्हा दहशतवाद्यांकडून घातपाताचा कट रचण्यात आला होता. मात्र जवानांच्या सतर्कतेने हा कट उधळला गेला.  दहशतवाद्यांनी जम्मू बसस्टॅण्डजवळ मोठयाप्रमाणावर दडवून ठेवलेली ७ किलो स्फोटकं जवानांनी हस्तगत केली. यामुळे मोठा अनर्थ टळला. पु

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We are proud of our security forces their bravery will continue to inspire generations narendra modi msr
First published on: 14-02-2021 at 14:19 IST