scorecardresearch

“We dare you…”; अभिनेते प्रकाश राज यांचं गृहमंत्री अमित शाह यांच्याविषयीचं ट्विट चर्चेत

अमित शाह यांनी नुकतंच हिंदी भाषेविषयी आपली मतं व्यक्त केली आहेत. त्यावरून प्रकाश राज यांनी हे ट्वीट केलं आहे.

अभिनेते प्रकाश राज हे सातत्याने सरकारवर आणि शासनाच्या धोरणावर भाष्य करत असतात. आपल्या ट्वीटच्या माध्यमातून ते आपली मतं व्यक्त करत असतात. नुकतंच त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दलही भाष्य केलं आहे. आमची घरं तोडू नका असं आवाहनही प्रकाश राज यांनी केलं आहे.


अमित शाह यांनी नुकतंच हिंदी भाषेविषयी आपली मतं व्यक्त केली आहेत. हिंदी भाषा ही इंग्रजी भाषेला पर्याय म्हणून वापरावी, स्थानिक भाषांना पर्याय म्हणून नव्हे, असं मत अमित शाह यांनी व्यक्त केलं होतं. यावरूनच प्रकाश राज यांनी एक प्रकारची विनंती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. प्रकाश राज आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, “आमची घरं तोडून नका मिस्टर होम मिनिस्टर. We dare you …हिंदीची बळजबरी थांबवा. आम्हाला आमची विविधता प्रिय आहे, आम्हाला आमच्या मातृभाषेविषयी प्रेम आहे, आम्हाला आमची ओळख प्रिय आहे.”

काय म्हणाले होते अमित शाह?

वेगवेगळ्या राज्यातील लोकांनी एकमेकांशी हिंदीत संवाद साधावा, इंग्रजीत नाही, असा सल्ला गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी दिला.“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवले आहे की सरकार चालवण्याचे माध्यम हे राजभाषा आहे आणि त्यामुळे हिंदीचे महत्त्व नक्कीच वाढेल. आता वेळ आली आहे की राजभाषेला देशाच्या एकात्मतेचा महत्त्वाचा भाग बनवण्याची.

जेव्हा इतर भाषा बोलणारे राज्यांचे नागरिक एकमेकांशी संवाद साधतात तेव्हा ते भारताच्या भाषेत असले पाहिजे, ”असे शाह यांनी संसदीय अधिकृत भाषा समितीच्या ३७ व्या बैठकीत सांगितले. शाह यांनी हिंदी भाषा ही इंग्रजीला पर्याय म्हणून वापरायला हवी, स्थानिक भाषांना नाही, असे स्पष्ट केले. इतर स्थानिक भाषांमधील शब्द स्वीकारून हिंदी भाषा अधिक लवचिक बनवावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: We dare you stop hindi imposition says prakash raj to home minister amit shah vsk

ताज्या बातम्या