एनआयए कोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांनी आमचा विजय निश्चित होईल अशी प्रतिक्रिया दिली आहे. एनआयए कोर्टाने बुधवारी साध्वी प्रज्ञा यांना निवडणूक लढवण्यापासून रोखण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. त्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी काँग्रेस सातत्याने माझ्या विरुद्ध कारस्थान रचत आहे. पण आमचा विजय निश्चित होईल. कारण सत्य आणि धर्माचा नेहमीच विजय होतो असे साध्वी प्रज्ञा म्हणाल्या.

साध्वी प्रज्ञा यांना भाजपाने भोपाळमधून उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध त्यांची लढत आहे. साध्वी प्रज्ञा यांच्याकडे कट्टर हिंदुत्वाचा चेहरा म्हणून पाहिले जाते तर दिग्विजय सिंह यांनी नेहमीच धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार केला आहे. त्यामुळे या लढतीकडे सगळया देशाचे लक्ष लागले आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांनी सर्वप्रथम शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. चौफेर टीका झाल्यानंतर माफी मागून वक्तव्य मागे घेतले. त्यानंतर बाबरी मशीद पाडल्याचा मला अभिमान आहे असे विधान केले.

साध्वी प्रज्ञा यांना निवडणूक लढवण्यापासून रोखता येणार नाही
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना लोकसभा निवडणूक लढवण्यापासून रोखण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली. यासंबंधीचा निर्णय निवडणूक अधिकाऱ्यांनी घ्यावा असे कोर्टाने म्हटले आहे.