सोशल मीडिया म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फेसबुक, व्हॉट्स अॅप आणि इंस्टाग्राम हे सगळं समोर येतंच. मात्र बुधवारी दुपारपासून या सगळ्याचा वेग कमालीचा मंदावला होता. नेटकऱ्यांना फेसबुक, ट्विटर, व्हॉटस् अॅप वापरताना अडचणी येत होत्या. फोटो आणि व्हिडिओ पाठवताचा वेग कमालीचा मंदावला होता. या सगळ्याबाबत आता फेसबुकने दिलगिरी व्यक्त केली आहे. आमच्या लाखो युजर्सना जो त्रास झाला त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत असं फेसबुकने म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

बुधवारी अनेक लोकांना मग ते व्यवसाय किंवा नोकरी क्षेत्रातले असोत किंवा इतर क्षेत्रातले त्यांना फेसबुकचा वेग मंदावलेला जाणवत होता. ते जेव्हा इमेजेस किंवा व्हिडिओ पाठवत होते त्यावेळी हा वेग मंदावला होता. मोबाईलवरच्या फेसबुक अॅपला अडचणी येत होत्या. मात्र आम्ही तेव्हापासूनच ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि आता ही समस्या पूर्णपणे सोडवली आहे. बुधवारपासून जो त्रास झाला त्याबद्दल आम्ही माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो असं फेसबुकने म्हटलं आहे.

फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्स अॅप या तिन्हीचा वेग बुधवारी दुपारपासून मंदावला होता. दुपारी २.४९ पासून ही अडचण जाणवू लागली होती. व्हिडिओ पोस्ट न होणे, इमेज डाऊनलोड न होणे या समस्या भेडसावत होत्या. यामागचे कारणही स्पष्ट करण्यात आले नव्हते. आता या सगळ्याबाबत फेसबुकने माफी मागितली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Were sorry for any inconvenience says facebook about its speed issue scj
First published on: 04-07-2019 at 07:33 IST