बुलबुल चक्रीवादळ शनिवारी रात्री पश्चिम बंगालमधील सागर बेटे आणि बांगलादेशातील खेपुपारा यामध्ये धडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानंतर ते बांगलादेशातील सुंदरबन या त्रिभूज प्रदेशाकडे सरकणार असल्याचा अंदाज कोलकातामधील हवामान खात्याने वर्तविला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चक्रीवादळ धडकल्यानंतर त्याचा वेग ११० ते १२० कि.मी. प्रतितास असेल आणि त्यासोबत ताशी १३५ कि.मी. वेगाचे वारेही वाहतील, असेही हवामान खात्याने म्हटले आहे. शनिवारी सायंकाळी पश्चिम आणि पूर्व मिदनापोर, दक्षिण आणि उत्तर २४ परगणा जिल्ह्य़ांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी ८० ते ९० कि.मी. इतका होता तो ताशी ११० ते १२० इतका वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

दरम्यान, चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस कोसळून पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये प्रत्येकी एक जण ठार झाल्याचे वृत्त आहे. पश्चिम बंगालच्या तटवर्ती क्षेत्राला मुसळधार पावसाने झोडपले, वृक्ष उन्मळून पडले आणि त्यामुळे कोलकाता शहरात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर ओडिशात भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West bengal bangladesh at risk of cyclone abn
First published on: 10-11-2019 at 01:45 IST