Sneha Debnath missing DU student from Tripura found in Yamuna : गेल्या सहा दिवसांपासून दिल्लीतून बेपत्ता असलेल्या स्नेहा देबनाथ हिची मृतदेह अखेर रविवारी संध्याकाळी यमुना नदीत आढळून आला आहे. पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. स्नेहा देबनाथ ही मूळची त्रिपुरा येथील रहिवासी होती आणि दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेत होती. दरम्यान तिचा मृतदेह अखेर सापडला असून तिच्या कुटुंबाने तिच्या मृतदेहाची ओळख पटवली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. १९ वर्षीय स्नेहा ही दक्षिण दिल्लीतील पर्यावरण कॉम्प्लेक्समध्ये राहत होती आणि तिला अखेरचे ७ जुलैच्या सकाळी पाहिले गेले होते.
हाताने लिहिलेली एक चिठ्ठी स्नेहाच्या खोलीत आढळून आली होती, ज्यावरून तिने काहीतरी टोकाचे पाऊल उचलले असल्याबाबत संशय व्यक्त केला जात होता. यानंतर दिल्ली पोलिसींनी मेहराउली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत तात्काळ एनडीआरएफ पथकाच्या मदतीने शोध मोहिम सुरू केली. तिचे माहिती असलेले लोकेशन हे दिल्लीतील सिग्नेचर ब्रिज असल्याचे पोलिसांनी समजले, त्या दिवशी सकाळी एका कॅब चालकाने तिला तेते आणून सोडले होते.
कुटुंबीयांशी अखेरचं बोलणं काय झालं होतं?
स्नेहा तिच्या आईला अखेरचं ७ जुलै रोजी सकाळी ५.५६ मिनिटांनी बोलणे झाले होते, तेव्हा तिने आपण पिटुनिया या मैत्रिणीबरोबर सराई रोहिल्ला रेल्वे स्टेशनवर जाणार असल्याचे सांगितले होते. पण सकाळी ८.४५ वाजता तिचा फोन बंद झाल्याचे आढळून आले, यामुळे तिचे कुटुंब चिंतेत पडले. तिच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांनी पिटुनिया या तिच्या मैत्रिणीशी संपर्क साधला, पण तिने आपण स्नेहाला आज भेटलोच नसल्याचे सांगितले.
मैत्रिणीने आपण स्नेहाला भेटलोच नसल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी स्नेहाने बुक केलेल्या कॅबचा शोध सुरू केला. या कॅब चालकाने सांगितलं की त्याने तिला दिल्लीतील सिग्नेचर ब्रिजच्या जवळ सोडलेहोते. हे ठिकाण आत्महत्या करण्याची जागा म्हणून ओळखले जाते, पण या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याने स्नेहा इथून पुढे कुठे गेली याबद्दल माहिती मिळू शकली नाही.
चार महिन्यांत कोणतीही आर्थिक व्यवहार नाहीत
स्नेहाच्या कुटुंबाच्या जवळच्या एका व्यक्तीने सांगितले की, स्नेहाने गेल्या चार महिन्यांपासून कोणतेही बँक व्यवहार केले नव्हते, त्यामुळे ती स्वत:चा उदरनिर्वाह कसा भागवत होती याबद्दल प्रश्व उपस्थित होत आहेत. इतकेच नाही तर ७ जुलै रोजी देखील ती काहीही बरोबर न घेता घरातून बाहेर पडली होती.
काही लोकांनी स्नेहा जेव्हा सिग्नेचर ब्रिजवर आली होती त्याचा कालावधीत एक मुलगी तेथे उभी असल्याचे पाहिले होते, त्यानंतर एनडीआरएफ आणि स्थानिक पोलिसांनी निगम बोध घाट ते नोएडा अशी संयुक्त शोध मोहीम राबवली. त्यानंतर रविवारी संध्याकाळी गीता कॉलनी फ्यायओव्हर येथे मृतदेह आढळून आला. यानंतर कुटुंबाने तो मृतदेह स्नेहाचा असल्याची ओळख पटवली