मद्यपान टाळणे आणि खादी वापरणे या जुन्या काँग्रेसच्या नियमांमुळे मंगळवारी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांसोबत सोनिया गांधींच्या बैठकीत काहींचे चेहरे पडले. २००७ मध्ये अशाच एका मेळाव्यात राहुल गांधींनी हा मुद्दा उपस्थित केला होता. तोच मुद्दा त्यांनी पक्षाच्या सदस्यत्व मोहिमेसाठी आयोजित केलेल्या बैठकीत पुन्हा उपस्थित केला आहे. इथे कोण कोण पिणारे आहेत? असा प्रश्न राहुल गांधी यांनी बैठकीत विचारला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रश्नामुळे उपस्थितांपैकी काही सदस्यांना अवघडल्यासारखे नवज्योत सिद्धू यांच्यावर प्रतिक्रिया देण्याची जबाबदारी येऊन पडली. त्यांनीही शिताफीने व अधिक खोलात न जाता उत्तर दिलं, “माझ्या राज्यातील बहुतेक लोक मद्यपान करतात.” एनडीटीव्हीने याविषयी दिलेल्या सविस्तर वृत्तात ही नोंद करण्यात आली आहे. ही परिस्थिती सामावून घेण्यासाठी सदस्यत्वाच्या नियमांमध्ये बदल करणे आवश्यक असले तरी ते सध्या करता आले नाही.

असे नियम पक्षाची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था म्हणजे केवळ कार्यसमितीच बदलू शकते. मात्र महात्मा गांधींच्या काळापासूनचा मद्यपान न करण्याचा नियम अद्यापही तसाच आहे. राहुल गांधी यांनी २००७ मध्ये काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत या नियमाची प्रासंगिकता आणि व्यावहारिक पैलूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

राज्य निवडणुकीच्या पुढच्या फेरीपूर्वी १ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या सदस्यत्व मोहिमेमध्ये सदस्यत्व अर्जावर या नियमाचा उल्लेख करण्यात आला आहे. सदस्य होऊ इच्छिणाऱ्या लोकांच्या वैयक्तिक घोषणा म्हणून पक्षाचे सदस्यत्व १० गुणांची यादी बनवते – दारू आणि ड्रग्सपासून दूर राहणे हा त्यापैकी एक मुद्दा आहे. पक्षाच्या धोरणांवर आणि कार्यक्रमांवर सार्वजनिक मंचावर कधीही टीका न करण्याचे वचनही नवीन सदस्यांना द्यावे लागेल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who all here drinks congress leaders rahul gandhi revisits crucial query at party meet vsk
First published on: 27-10-2021 at 10:52 IST