राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरल्याने धर्मसंसद वादात अडकली असून यासोबतच एक नाव चर्चेत आलं ते म्हणजे कालीचरण महाराज. कालीचरण महाराजने महात्मा गांधींबद्दल अत्यंत आक्षेपार्ह उल्लेख करत शिवीगाळ केली. यामुळे मोठा गदारोळ झाला आणि महाराष्ट्रासह देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले. अखेर छत्तीसगड पोलिसांनी मध्य प्रदेशातून कालीचरण महाराजला अटक केली आहे. पण हा कालिचरण महाराज नेमका आहे तरी कोण? त्याचा आणि महाराष्ट्राचा काय संबंध? हे जाणून घेऊयात.

कालीचरण महाराज हा मूळचा अकोल्याचा आहे. कालीचरण महाराजचं मूळ नाव अभिजीत धनंजय सारंग असून अकोल्यातील जुने शहर भागातील शिवाजीनगर भागातील भावसार पंच बंगल्याजवळ राहतो. त्याच्या आईचं नाव सुमित्रा तर वडिलांचं नाव धनंजय सारंग आहे.

मोठी बातमी! महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजला अटक

शिक्षणाचा कंटाळा आणि त्यात खोडकर स्वभाव असल्याने आठवीपर्यंत शिक्षण घेतलं. आई-वडिलांनी प्रयत्न केले पण काही फायदा झाला नाही. अध्यात्माकडे ओढ असल्याने शाळा सोडली आणि हरिद्वारला जाऊन दिक्षा घेतली. नंतर पुढे हाच अभिजीत सारंग कालीचरण महाराज झाला.

एका मुलाखतीत बोलताना कालीचरण महाराजने सांगितलं होतं की, “मला शाळेत जाणं पसंत नव्हतं. शिक्षणात मला कोणताही रस नव्हता. जर मला जबरदस्तीने शाळेत पाठवलं तर मी आजारी पडायचे. सर्वजण माझ्यावर प्रेम करायचे त्यामुळे माझं म्हणणं ऐकायचे. माझी धर्माकडे ओढ असल्याने अध्यात्माकडे वळलो”.

धर्म संसदेत वादग्रस्त विधाने सुरूच; गोडसेचं कौतुक करत महात्मा गांधींसाठी वापरले अपशब्द, मुख्यमंत्र्यांनी सोडला कार्यक्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कालिभक्त म्हणून त्याने कालिचरण महाराज नाव धारण केलं. आपण कालीमातेला आई तर अगस्ती ऋषींना गुरु मानत असल्याचं तो सांगू लागला. दोन वर्षांपुर्वी अकोल्यातल्या पुरातन शिवमंदीरात शिवतांडव स्तोत्र म्हटलं आणि व्हिडीओ व्हायरल झाल्याने कालीचरण महाराज प्रसिद्धीझोतात आला. २०१७ मध्ये अकोला महापालिकेच्या निवडणुकीत कालीचरण महाराजला पराभवाचा सामना करावा लागला.