पीटीआय, भोपाळ

मध्य प्रदेशातील भाजप सरकारने भ्रष्टाचाराचे आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढल्याचा आरोप काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी नरेला येथील जाहीर प्रचारसभेत सोमवारी केला.मध्य प्रदेशातील भाजप सरकारने केलेल्या गैरव्यवहारांची ईडी, सीबीआय किंवा प्राप्तिकर चौकशी का केली जात नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

BJP manifesto does not mention job creation statehood for Kashmir
महागाई, एनआरसीबाबत भाजपचे मौन; रोजगारनिर्मिती, काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याचा जाहीरनाम्यात उल्लेख नाही
uddhav thackeray criticized pm narendra modi
“काश्मीर ते मणिपूरपर्यंत खदखद अन् हिंसाचार, तरीही भारतीय नीरोचे…”; ‘त्या’ दाव्यावरून ठाकरे गटाची पंतप्रधान मोदींवर टीका!
In Raigad farmers will not be treated unfairly says Uday Samant
रायगडमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होणारा निर्णय घेणार नाही, उरणमधील महायुतीच्या सभेत पालकमंत्र्यांची ग्वाही
Complaint against Fadnavis
फडणवीस व भाजप उमेदवार राम सातपुतेंविरुद्ध आचार संहिता भंग केल्याची तक्रार, मोची समाजाला प्रलोभन दाखविण्याचा आरोप

भाजपच्या कथित भ्रष्टाचाराच्या पुष्टय़र्थ राहुल यांनी एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने कोटय़वधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आणि शिवराज चौहान सरकारच्या गैरव्यवहारांच्या कथित चित्रफितींचा हवाला दिला. भाजपचे तोमर नावाचे मंत्री आहेत. त्यांचा एका ध्वनिचित्रफीतीत १० कोटी इकडे पाठवा, २० कोटी तिकडे द्या आणि १०० कोटी बँकेच्या खात्यात जमा करा, असे म्हणत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.