why Radhika Yadav shot dead by father : राधिका यादव या २५ वर्षीय राज्य स्तरीय टेनिसपटूला तिच्याच वडीलांनी गोळ्या घालून ठार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरूवारी गुरुग्राम येथील तिच्या राहत्या घरात ही घटना घडली. तिचे वडील दीपक यादव यांनी तिच्यावर तीन गोळ्या झाडल्याचा आरोप असून इतर कुटुंबीयांनी दिलेल्या जबाबानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. गुरूवारी सकाळी गुरुग्राममधील सेक्टर ५७ मधील त्यांच्या स्वयंपाक घरात १०.३० वाजता ही घटना घडली.

तपास करणाऱ्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, राधिका यादवचे वडील, ५१ वर्षीय दीपक यादव हा राधिका टेनिस अकादमी चालवत असल्यावरून नाराज होता. कुटुंबाचे मूळ गाव म्हणजेच वजिराबादमधील अनेक लोक कथितपणे त्याला मुलीच्या टेनिस अकादमीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर पोट भरत असल्याबद्दल टोमणे मारत होते, यामुळे दीपक यादव याचा राग अनावर झाला. त्याची राधिकाने टेनिस अकादमी बंद करावी अशी त्यांची इच्छा होती, परंतु तिने तसं करण्यास नकार दिला.

“तिने अकादमी बंद करावी अशी त्यांची इच्छा होती, पण तिने नकार दिला.,अखेर या वादातून त्याने गोळ्या घालून तिला ठार केले,” असे सहायक पोलीस आयुक्त यशवंत यादव यांनी सांगितले.

पोलिसांनी काय सांगितलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्यआ वडीलांनी दावा केला की तो मुलीचे करिअर आणि कमाईवरून होत असलेल्या समाजाच्या टीकेमुळे गेल्या १५ दिवसांपासून नैराश्यात गेला होता. तसेचट एफआयआरमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, त्याने कथितपणे म्हटले की त्याच्या स्वाभिमानाला धक्का पोहचवणारी नामुष्की ते यापेक्षा जास्त सहन करू शकत नव्हता. हिंदुस्ताम टाईम्सने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

दरम्यान एफआयआरनुसार, राधिकाची आई, मंजू यादव यांनी मात्र आपल्याला ताप आला असून आपण काहीही पाहिले नाही असे सांगत पोलिसांना जबाब देण्यास नकार दिला.

या प्रकरणी गुरुग्रामच्या सेक्टर ५६ पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात राधिकाच्या वडिलांचा तिच्या प्रेम संबंधांना विरोध किंवा इन्स्टाग्रामवरील सोशल मीडिया रील असा दुसरा काही अँगल आहे का याचा देखील शोध घेतला जात आहे.

राधिका ही अत्यंत हुशार आणि होतकरू खेळाडू होती. तिने स्कॉटीश हाय इंटरनॅशनल स्कूलमधून पदवीचे शिक्षण घेतले होते. त्याच्या आधी २०१८ मध्ये तिने कॉमर्समधून १२वी उत्तीर्ण केली होती आणि शाळेच्या दिवसांपासूनच तिने टेनिस खेळण्यास सुरूवात केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.