अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचा निर्धार

मित्र राष्ट्रांना एकत्र येण्याचे आवाहन

सीरिया, इराकपाठोपाठ पॅरिस व अन्यत्र दहशतवादाचे थैमान घातलेल्या आयसिस या दहशतवादी संघटनेचा बीमोड करण्यात कोणतीही कसूर ठेवणार नसल्याचा निर्धार अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी बोलून दाखवला आहे. तुर्कस्तान व आशियातील काही देशांचा दौरा आटोपून मायदेशी परतत असताना ओबामा यांनी येथील आसिआन परिषदेला हजेरी लावली. त्यात ते बोलत होते.
आयसिसने पॅरिस येथे केलेला हल्ला, त्यानंतर मालीतील दहशतवादी हल्ला, बेल्जियममध्ये सुरू असलेले थैमान, इराक-सीरियात आयसिस दररोज करत असलेली हत्याकांडे या सर्व पाश्र्वभूमीवर एकूणच जागतिक स्तरावर दहशतवादाचे सावट निर्माण झाले आहे. या संदर्भाच्या पाश्र्वभूमीवर ओबामा बोलत होते. त्यांनी यावेळी रशियालाही दहशतवादाविरोधातील लढाईत एकत्र येण्याचे आवाहन केले. तसेच मित्र राष्ट्रांनाही साद घातली आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना आवाहन करताना ओबामा म्हणाले की, आयसिसने रशियाचे विमान पाडल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अशा परिस्थितीत रशियाने आयसिसवरील हल्ले तीव्र करायला हवे. तसेच सीरियाचे अध्यक्ष बशर असाद यांच्या बाजूने न लढता अमेरिका व मित्र राष्ट्रांची साथ दिली पाहिजे. आयसिसने घातलेले दहशतवादाचे थैमान आता अधिक वाढू न देता त्यांना वेळीच ठेचण्याची गरज असल्याचे ओबामा म्हणाले. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतही आयसिसविरोधात जागतिक आघाडी उघडण्याचा ठराव संमत झाला आहे, हे विशेष.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्ही भयभीत झालेलो नाही, हे दहशतवाद्यांना दाखवून देणे हेच आपल्याकडील सर्वात मोठे शस्त्र आहे. आयसिसचा बीमोड करण्यासाठी अमेरिका व मित्र राष्ट्रे अथक प्रयत्न करतील.
– बराक ओबामा,
अमेरिकेचे अध्यक्ष
दहशतवादाला भौगोलिक सीमा नाही – नरेंद्र मोदी</p>

दहशतवाद हा काही कोण्या एका विशिष्ट भौगोलिक प्रदेशाचा प्रश्न नसून तो आता एक जागतिक प्रश्न झाला आहे. त्याचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसिआन परिषदेत बोलताना व्यक्त केले. पॅरि, अंकारा, बैरूत, माली येथील दहशतवादी हल्ले व रशियाचे विमान पाडण्याची कृती यातून दहशतवादाला भौगोलिक सीमा नसल्याचेच प्रतीत होते, त्यामुळे या भस्मासुराला गाडण्यासाठी सर्वानी एकत्र येण्याची गरज असल्याचे मोदी म्हणाले.
दहशतवाद आणि धर्म हे परस्परांपासून वेगळे केले जाणे गरजेचे असल्याचे मतही मोदी यांनी क्वालालम्पूर येथे भारतीय समुदायापुढे बोलताना व्यक्त केले.