संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या सुरूवातीलाच दोन्ही सभागृहांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली.लोकसभा अध्यक्षा मीराकुमार आणि उपराष्ट्रपती व राज्यसभेचे अध्यक्ष डॉ. हमीद अन्सारी यांनी बाळासाहेबांनी केलेल्या भरीव कार्याची माहिती सभागृहाला देत श्रद्धांजली अर्पण केली. बाळासाहेबांच्या स्मरणार्थ सभागृहाचं कामकाज एक दिवसासाठी तहकूब करावं, अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली होती. मात्र, सरकाराने भाजपच्या मागणीला विरोध करत कामकाजाला सुरूवात केली.
संसदेचं पावसाळी अधिवेशन कोळसा घोटाळ्यामुळे गाजलं होतं. पण आता तो मुद्दा मागे पडला असून यावेळच्या अधिवेशनात विदेशी गुंतवणुकीसारखे महत्त्वाचे विषय गाजण्याची आणि त्यावरून अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता आहे.
भाजपने रिटेल क्षेत्रात एफडीआयच्या मुद्द्यावर मतदानाची मागणी केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी सरकारच्या या निर्णयाविरोधच अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Nov 2012 रोजी प्रकाशित
संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू; दोन्ही सभागृहांमध्ये बाळासाहेबांना श्रद्धांजली
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या सुरूवातीलाच दोन्ही सभागृहांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली. लोकसभा अध्यक्षा मीराकुमार आणि उपराष्ट्रपती व राज्यसभेचे अध्यक्ष डॉ. हमीद अन्सारी यांनी बाळासाहेबांनी केलेल्या भरीव कार्याची माहिती सभागृहाला देत श्रद्धांजली अर्पण केली.

First published on: 22-11-2012 at 12:50 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Winter session of parliament begins