Crime News : पतीची हत्या केली मृतदेहाची विल्हेवाटही लावली, पण प्रीयकराची एक चूक अन् उलगडलं हत्येचं गुढ गुन्हेगार पती ड्रग्जच्या नशेत तिला वारंवार मारहान करत असे, याला कंटाळून एका ३४ वर्षीय महिलेने पतीच्या हत्येचा कट रचला. पतीची हत्या केली आणि मृतदेह दुसऱअया राज्यात एका कालव्यात फेकून दिला. यानंतर ती महिला तिच्या प्रीयकराबरोबर नवीन आयुष्य सुरू करण्याची योजना आखू लागली. पण पतीचा फोन आणि तिच्या प्रियकराची एक चूक यामुळे तिचं कारनामा जगासमोर उघड झाला.

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून प्रितम प्रकाश याचा शोध घेतला जात होता. प्रकाश याचे जुने गु्न्हेगारी रेकॉर्ड राहिले आहे. त्याला एका प्रकरणात फरार देखील घोषित करण्यात आले होते. पण त्याचा शोध घेणाऱ्या पोलिसांना एक वेगळ्याच कटाचा सुगावा लागला. ज्यामध्ये प्रीतमची पत्नी सोनियाने त्याच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक बाब समोर आली. सोनियाला तिचे आयुष्य नव्याने सुरू करायचे होते. आता या प्रकरणात सोनिया आणि तिचा प्रियकर रोहित य़ा दोघांना अटक करण्यात आली आहे आणि या दोघांनीही हत्येच्या कटात सहभागी असल्याचे कबूल केले आहे.

३४ वर्षीय सोनियाने पोलिसांना सांगितले की तिचे लग्न वयाच्या १६ व्या वर्षी ४२ वर्षीय प्रीतमबरोबर झाले. कुटुंबीयांनी आक्षेप घेतल्यानंतरही तिने लग्न केले. या जोडप्याला एक मुलगा आणि दोन मुली देखील आहेत आणि ते दिल्लीत राहातात. प्रीतम याला ड्रग्जचे वेसन होते आणि तो अनेक गुन्ह्यांमध्ये अडकलेला होता. सोनियाने पोलिसांना सांगितले की तिने प्रीतमची ड्रग्जची सवय आणि गुन्हेगारी सोडवण्याचा प्रयत्न केला, पण तसे झाले नाही. तो नशेत घरी येत असे आणि तिला मारत असे.

२०२३ मध्ये तिची रोहितश ओळख झाली, तो एक कॅब ड्रायव्हर होता आणि त्याचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी राहिली आहे. दोघांचे प्रेमसंबंध सुरू झाले आणि कालांतराने त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण प्रीतमचा अडथळा होता. त्यानंतर सोनियाने नव्या आयुष्याच्या सुरूवातीसाठी प्रीतमच्या हत्येची योजना आखली.

सोनियाने सांगितले की गेल्या वर्षी २ जुलै रोजी तिचे प्रीतमशी भांडण झाले आणि ती तिच्या बहिणीच्या घरी हरियाणातील सोनिपत येथे गेली. रोहित तिला तिथे घेऊन गेला. जात असताना तिने रोहितला प्रीतमची हत्या कर जेणेकरून आपल्याला बरोबर राहाता येईल असे सांगितलं. रोहित यापूर्वी चार गुन्ह्यांच्या प्रकरणात सहभागी राहिलेला होता, ज्यामध्ये एक हत्येचे प्रकरण देखील होते.

रोहितने तिला सांगितले की तो हत्या करू शकणार नाही आणि त्याने तिला प्रीतमची सुपारी देण्यासाठी ६ लाख रुपयांची व्यवस्था करण्यास सांगितले. पण सोनियाकडे तेवढे पैसे नसल्याने त्यांनी हा विचार सोडून दिला. आणि रोहितने तिला सोनिपत येथे सोडले.

दुसरा प्लॅन ठरला

गेल्या वर्षी ५ जुलै रोजी प्रीतम सोनियाला घरी घेऊन येण्यासाठी सोनिपत येथे गेला आणि त्यांच्यात पु्न्हा वाद झाला. त्यानंतर प्रीतमचा काटा काढण्याचा निर्णय घेतलेली सोनिया तिच्या बहिणीचा पती विजय याच्याकडे गेली. विजयने तो १ लाख रुपयांच्या बदल्यात प्रीतमला मारेल असे सांगितले, यावर सोनिया म्हणाली की ती फक्त ५०,००० रुपयांची व्यवस्था करू शकते. अखेर या दोघांमध्ये सौदा झाला.

संध्याकाळी प्रीतमने पुन्हा सोनियाकडे घरी येण्याची विचारणा केली. यावेळी तिने नकार दिला पण त्याला रात्री तिच्या बहिणीच्या घरी राहा असे सांगितले. आणि त्याच रात्री विजयला त्याची हत्या करण्यास सांगितले. प्रीतम आणि विजय खालच्या खोलीत झोपले तर सोनिया आणि इतर छतावर झोपण्यासाठी गेले. विजयने प्रीतमची हत्या केली आणि मृतदेह कापडात गुंडाळून तो जवळच्या गटारात फेकून दिला. सोनियाला प्रीतमचा फोन सापडला आणि तिने तो स्वतःकडे ठेवून घेतला. काही दिवसांनी प्रीतमचा मृतदेह गटारात आढळून आला. पण त्याची ओळख पटू शकली नाही आणि प्रकरण शांत झाले.

पुरावे लपवण्यासाठी सोनियाने प्रीतम हरवल्याची तक्रार अलिपूर येथे दिली. ५ जुलैपासून पती बेपत्ता असल्याचे तिने तक्रारीत म्हटले. तिने प्रीतमचा फोन रोहितला दिला आणि तो नष्ट कर असे सांगितले.

असा उलगडला गुन्हा

या खून प्रकरणाचा उलगडा एक गुन्हेगार बेपत्ता झाल्याचा तपास करत असताना झाला. गुन्हे शाखेच्या पथकाला प्रीतम अनेक महिन्यांपासून बेपत्ता असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की पत्नीने बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती, परंतु त्यानंतर काहीही माहिती मिळाली नाही.

जेव्हा त्यांनी प्रीतमचा फोन ट्रॅक केला तेव्हा त्यांना आढळले की तो वापरला जात होता आणि त्याचे शेवटचे लोकेशन सोनिपत होते. सोनियाने सांगूनही रोहितने प्रीतमचा फोन नष्ट केला नव्हता.

त्यानंतर पोलिसांनी रोहितवर पाळत ठेवली आणि त्याचा गुन्हेगारी पार्श्वभूमी देखील समोर आली. अखेर त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. सुरुवातीला रोहितने लक्ष दुसरीकडे विचलित करण्याचा प्रयत्न केला आणि त्याने फोन कोणाकडून तरी विकत घेतल्याचे सांगितले. पण पोलिसांनी दबाव टाकताच त्याने सर्वकाही सांगून टाकले. त्याने सोनियासोबतचे त्याचे प्रेमसंबंध, प्रीतमचा खून करण्याचा कसा तिने कट रचला होता, नातेवाईकाला दिलेली सुपारी आणि प्रीतमची हत्या करून त्याच्या मृतदेहाची कशा पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली हेही सांगितले.

नंतर पोलिसांनी सोनियाला ताब्यात घेतले आणि तिची चौकशी केली. सुरुवातीला नकार दिल्यानंतर, तिने गुन्ह्याची कबुली दिली आणि प्रीतमची हत्या करण्यासाठी विजयला पैसे दिल्याचे कबूल केले, असे पोलिसांनी सांगितले.

रोहित आणि सोनियाला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तर विजयला एका चोरीच्या गुन्ह्यात आधीच अटक करण्यात आली होती आणि तो सध्या तुरुंगात आहे. तसेच सोनियाशी संबंध असूनही रोहितने एप्रिलमध्ये लग्न केल्याचेही पोलिसांनी सांगितले.