पाकिस्तानमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पाकिस्तानचे प्रधानमंत्री इमरान खान यांनी अत्याचाराच्या घटनेबाबत महिलांच्या कपड्याला दोष दिला आहे. इमरान खान यांनी यापुर्वी देखील, असे विधान केले होते. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये होणारी वाढ महिलांच्या कपड्यांशी संबंधित असल्याचे वारंवार सांगून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर तीव्र टीका होत आहे. “अ‍ॅक्सिओस ऑन एचबीओ” ला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान म्हणाले, “जर एखाद्या महिलेने फार कमी कपडे घातले असतील तर त्याचा पुरुषांवर परिणाम होतो. त्या रोबोट असल्यास हे घडणार नाही. ही केवळ शहाणपणाची बाब आहे.”

इम्रान खानच्या या टीकेने सोशल मीडियावर त्याचा संताप पसरला आहे. विरोधी पक्ष नेते आणि पत्रकार त्यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयीन आयोगाच्या दक्षिण आशियातील कायदेशीर सल्लागार रीमा ओमर यांनी ट्विट केले आहे की, “पाकिस्तानमधील लैंगिक हिंसाचाराच्या कारणांबद्दल पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा पीडितेला दोष देणे. हे अत्यंत निराशाजनक विधान आहे.”

हेही वाचा- मुदसीर पंडितसह ‘लश्कर-ए-तोयबा’च्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा; लष्कराची मोठी कारवाई

डिजिटल माध्यमांवरील पंतप्रधानांचे फोकल पर्सन डॉ. अरसलन खालिद म्हणाले की, “इमरान खान यांनी केलेल्या वक्तव्याचे संदर्भाव्यतीरीक्त ट्वीट केले जात आहेत. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. ते आपण कोणत्या प्रकारच्या समाजात राहत आहोत आणि समाजातील लैंगिक निराशेबद्दल बोलले होते.”

हेही वाचा- गुगल सर्च करून रचला हत्येचा कट! महाराष्ट्रातून घरी परतलेल्या पतीला प्रियकराच्या मदतीने संपवलं

इम्रान खान यांनी यापूर्वी पाकिस्तानमध्ये लैंगिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये होणाऱ्या अश्लीलतेला दोष दिला होता. एका मुलाखतीत पंतप्रधान इम्रान खान म्हणाले होते की, “पडद्याची ही संपूर्ण संकल्पना प्रलोभन टाळण्यासाठी आहे. सर्वांनी ते टाळण्याची इच्छा नसते.”

बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी त्यांच्या सरकारने घेतलेल्या पाऊलांबद्दल एका प्रश्नाला इम्रान खान उत्तर देत होते. एप्रिलमध्ये खान यांच्या टीकेनंतर शेकडो लोकांनी त्यांनी माफी मागावी म्हणून निवेदनावर स्वाक्षरी केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women clothing responsible for rape in pakistan strange statement by pm imran khan srk
First published on: 21-06-2021 at 13:33 IST