World Health Organization PC : भारतासह इतर काही देशांमध्ये करोनाच्या ओमायक्रॉनच्या व्हेरिअंटचा एक नवीन उपप्रकार आढळतो आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संस्थेच्यावतीने देण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संस्थेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

ते म्हणाले, ”गेल्या दोन आठवड्यात करोनाच्या जागतिक स्तरावर नोंदवलेल्या केसेसेमध्ये जवळपास 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. युरोप आणि अमेरिकेत, बीए ४ आणि बीए ५ या व्हेरियंटची रुग्णसंख्या वाढते आहे. तर भारतासह इतर देशांमध्ये ओमिक्रॉनचा बीए २.७५ हा उपप्रकार आढळून येत आहेत. आम्ही त्यावर लक्ष ठेऊन आहे.”

ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्यांनी म्हटले, ”ओमायक्रॉनच्या हा उपप्रकार सर्वात प्रथम भारतात आढळून आला होता. त्यांना तो इतर १८ देशात आढळून आला. याच्या मोजक्याच काही केसेस आढळून आल्या आहेत. मात्र, या उपप्रकाराच्या काही म्यूटेशन बघायला मिळाले आहेत. विशेषता याच्या स्पाईक प्रोटीनमध्ये हे बदल आढळून आले आहेत. त्यामुळे आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहे. हा उपप्रकार रोगप्रतिकार क्षमता कमी करतो का, किंवा हा किती घातक आहे. हे सांगणे सद्या कठीण आहे. आम्ही त्याचा अभ्यास करतो आहे.”

तसेच दक्षिण-पूर्व आशिया प्रदेशांमध्ये जूनच्या सुरुवातीपासून ओमायक्रॉनच्या नव्या उपप्रकाराचे रुग्ण वाढण्यास सुरूवाद झाली होती. या देशांमध्ये दीड लाखांच्यावर रुग्णांची नोंद झाली होती. तर मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात 20% वाढ झाली आहे. भूतान, नेपाळ आणि बांग्लादेशमध्ये सर्वात जास्त प्रमाणात या रुग्णांची नोंद झाली आहे, अशी माहिती सौम्या स्वामीनाथन यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – ‘रिक्षावाल्यांना हिणवण्यामध्ये आणि त्यांचे दु:ख समजून घेण्यामध्ये फरक असतो’, केसरकरांचा उद्धव ठाकरेंना टोला