जगातील एकूण अण्वस्त्रांची संख्या गतवर्षांत कमी झाली आहे. असे असले तरी विविध देश त्यांच्या अण्वस्त्र साठय़ात आधुनिकता आणत आहेत असे एका अहवालात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रीसर्च इन्स्टिटय़ूट या संस्थेने म्हटले आहे की, अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, चीन, भारत व पाकिस्तान, इस्रायल, उत्तर कोरिया या देशांकडे एकूण १३,८६५ अण्वस्त्रे आहेत. याचा अर्थ अण्वस्त्र संख्या २०१८ च्या तुलनेत सहाशेने कमी झाली आहे. अण्वस्त्र संख्या कमी झाली असली तरी  चीन, भारत, पाकिस्तान हे देश त्यांची अण्वस्त्रे आधुनिक करीत आहेत. या संस्थेच्या अण्वस्त्र नियंत्रण कार्यक्रमाचे संचालक श्ॉनन किली यांनी सांगितले की, जगात अण्वस्त्रे कमी होत असली तरी त्यांचे स्वरूप बदलत आहे. अमेरिका व रशिया यांच्याकडे जगातील नव्वद टक्के अण्वस्त्रे आहेत. त्यांनी अण्वस्त्रांची संख्या कमी केली आहे. नवीन स्टार्ट करारावर २०१० मध्ये अमेरिका व रशिया यांनी स्वाक्षऱ्या केल्या असून त्यात सज्ज अण्वस्त्रांची संख्या कमी ठेवण्याचे बंधन आहे. शीतयुद्धकाळातील अण्वस्त्रे काढून टाकण्यात यावीत अशीही अट त्यात आहे. स्टार्ट करार २०२१ मध्ये संपत असून त्याची मुदत वाढवण्यासाठी गांभीर्याने चर्चा करण्यात येत नाही हे घातक आहे. पुढील वर्षी अण्वस्त्र प्रसारबंदी करारास पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. १९८० च्या मध्यावधीत अण्वस्त्रांची संख्या ७० हजार होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World number of nuclear weapons decreases in the last year
First published on: 18-06-2019 at 01:19 IST