राष्ट्रपतीपदाची निवडणूक येत्या १८ जुलै रोजी होणार आहे. प्रत्यक्ष निवडणुकीचा दिवस जवळ येत असल्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी पक्षाकडून मतांची जुळवाजुळव केली जात आहे. असे असताना विरोधी पक्ष पुरस्कृत उमेदवार यशवंत सिन्हा यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या अंमलबजावणीबाबत मोठे भाष्य केले आहे. मी राष्ट्रपती झालो, तर सीएए कायदा लागू होऊ देणार नाही, असे यशवंत सिन्हा म्हणाले आहेत. एक दिवसीय आसाम दौऱ्यावर असताना सिन्हा यांनी वरील वक्तव्य केलं आहे.

हेही वाचा >>> Sri Lanka Crisis : “जे आवश्यक ते सर्व करा,” कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे अॅक्शन मोडमध्ये!

आसाममध्ये असताना यशवंत सिन्हा यांनी विरोधी पक्षातील खासदारांशी संवाद शाधला. येथे बोलताना त्यांनी “भाजपाप्रणित केंद्र सरकार अजूनही नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करु शकलेले नाही. नागरिकत्व हा आसामध्ये एक प्रमुख मुद्दा आहे. केंद्र सरकारला हा कायदा देशभरात लागू करायचा आहे. मात्र मसुदाच कमकुवत असल्यामुळे सरकारला आजतागायत सीएए कायदा लागू करता आलेला नाही,” असे सिन्हा म्हणाले.

हेही वाचा >>> नव्या संसद भवनावरील अशोक स्तंभाच्या प्रतिकृतीत खरंच बदल केलेत? औरंगाबादेतील शिल्पकारानं केला खुलासा!

तसेच, यायाधी “केंद्र सरकारने करोनाचे कारण देत या कायद्याची अंमलबजावणी लांबवली होती. भारतीय संविधानाला बाहेरील शक्तींमुळे नाही तर सत्तेत असलेल्या लोकांपासून धोका आहे. आपण त्याचे संरक्षण केले पाहिजे,” असेही यशवंत सिन्हा यांनी सीएएबाबतची आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले. तसेच शेवटी बोलताना मी जर राष्ट्रतपी झालो तर सीएए कायदा लागू होऊ देणार नाही, असे आश्वासन यशवंत सिन्हा यांनी दिले.

हेही वाचा >>> जेव्हा मुख्यमंत्र्यांनाही पाणीपुरी स्टॉलवर पाणीपुरी बनवण्याचा मोह आवरत नाही; Video झाला Viral

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, येत्या १८ जुलै रोजी देशाच्या १६ व्या राष्ट्रपतींसाठी निवडणूक होणार आहे. तर मतमोजणी २१ जुलै रोजी केली जाईल. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ येत्या २४ जुलै रोजी समाप्त होणार आहे. तर २५ जुलै रोजी देशाचे नवे राष्ट्रपती शपथ घेतील.