scorecardresearch

Premium

योगी आदित्यनाथ यांची मजुरांशी भेट

सतरा दिवसांच्या अग्निपरीक्षेनंतर उत्तराखंडच्या सिलक्यारा बोगद्यातून सुटका करण्यात आलेल्या उत्तर प्रदेशच्या मजुरांची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी भेट घेतली.

Yogi Adityanath meeting with laborers
योगी आदित्यनाथ यांची मजुरांशी भेट

पीटीआय, लखनऊ

सतरा दिवसांच्या अग्निपरीक्षेनंतर उत्तराखंडच्या सिलक्यारा बोगद्यातून सुटका करण्यात आलेल्या उत्तर प्रदेशच्या मजुरांची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी भेट घेतली.मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी झालेल्या या भेटीत योगींनी या मजुरांच्या प्रकृतीची व ख्यालीखुशालीची वैयक्तिकरीत्या चौकशी केल्याचे एका अधिकृत प्रवक्त्याने सांगितले.

asha workers protest at ajit pawar s bungalow
नागपूर: आशा स्वयंसेविकांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यापुढे ठिय्या आंदोलन, मागणी पूर्ण होईस्तोवर…
Supriya Sule pune
लोकांच्या कामासाठी कोणाकडेही जाण्यास काहीच अडचण नाही – सुप्रिया सुळे
gadchiroli medigadda dam marathi news, medigadda dam became dangerous marathi news, medigadda dam cracks marathi news
धोकादायक ‘मेडीगड्डा’ धरणामुळे दोन राज्यांतील नागरिकांचा जीव टांगणीला! राजकीय आरोप- प्रत्यारोप
Home Minister Devendra Fadnavis marathi news, three murders nagpur marathi news, nagpur crime news
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहशहरात चोवीस तासांत तीन हत्याकांड; अखेर ‘त्या’ जखमीचाही मृत्यू

योगी आदित्यनाथ यांनी सर्व मजुरांना शाली व इतर भेटवस्तू दिल्या. या संपूर्ण कठीण काळात तुम्ही तुमची आशा व धैर्य कायम राखले आणि एकमेकांना धीरही दिला, असे ते या मजुरांना उद्देशून म्हणाले. तुम्ही नक्कीच बाहेर याल याची आम्हाला खात्री होती, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.मुख्यमंत्र्यांना भेटणाऱ्यांमध्ये श्रावस्ती जिल्ह्यातील अंकित (२५), राम मिलन (३२), सत्यदेव (४४), संतोष (२४), जयप्रकाश (२२) व रामसुंदर (२६), लखीमपूर खेरी येथील मनजित (२२) आणि मिर्झापूर जिल्ह्यातील अखिलेश (३२) यांचा समावेश होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Yogi adityanath meeting with laborers amy

First published on: 02-12-2023 at 02:19 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×