देशातून भ्रष्टाचार मिटवायचा असेल तर ५०० आणि २ हजाराच्या नोटा बंद करा, पुन्हा एकदा नोटाबंदीचा निर्णय घ्या असा अजब सल्ला योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी दिला आहे. ५०० आणि २ हजाराच्या नोटा बंद केल्या तरच देशातल्या भ्रष्टाचाराला आळा बसेल असे या नेत्याने म्हटले आहे. भाजपाविरोधात काहीतरी वक्तव्य करून पक्ष अडचणीत आणण्याचं काम या राजभर यांनी याआधीही केलं आहे. आता पुन्हा एकदा पक्षाच्या विरोधातली भूमिका घेत ५०० आणि २ हजाराच्या नोटा बंद कराव्यात असा सल्ला राजभर यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भ्रष्टाचार मिटवायचा असेल तर १ रुपया ते १०० रुपये एवढ्याच नोटा चलनात ठेवण्यात याव्यात असाही सल्ला राजभर यांनी दिला. २ वर्षांपूर्वी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी ५०० आणि आणि १ हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्या. या निर्णयानंतर २ हजाराची नोट मोदी सरकारनेच चलनात आणली. आता २ हजाराच्या नोटा आणि ५०० च्या नोटांवर बंदी आणली जावी अशी मागणी योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी केली आहे.

याआधी योगगुरु बाबा रामदेव यांनीही २ हजारांच्या नोटा चलनातून बाद केल्या जाव्यात असे मत व्यक्त केले होते. आता ओमप्रकाश राजभर यांनी नोटाबंदीला दोन वर्षे झाल्यानंतर पुन्हा एकदा ५०० आणि २ हजाराच्या नोटा बंद करण्याचा अजब सल्ला दिला आहे.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogis minister omprkash rajbhar ask to ban 2000 and 500 rs notes
First published on: 14-11-2018 at 13:48 IST