आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून कन्हैया कुमारसारख्या लोकांनी काही म्हटलेले खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा गोव्याचे पर्यावरण आणि वनमंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी दिला. ते पणजी येथील एका कार्यक्रमात बोलत होते. हे सगळे विचार साम्यवादी विचारसरणीतून उद्याला आले आहेत. यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार वाचण्याची गरज आहे. साम्यवाद आपल्याला कोणत्या दिशेने नेत आहे, याचे आत्मपरीक्षण करण्याची हीच वेळ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. हे कशाप्रकराचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे?, याचा अर्थ तुम्ही काही म्हणणार का?, असे सवाल त्यांनी उपस्थित केले. देशातील काही तरूण देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देत असताना काही तरूणांचा गट आझादीचे नारे देत आहे, ही गोष्ट वेदनादायी असल्याचे अार्लेकर यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 12th Mar 2016 रोजी प्रकाशित
‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ‘आझादी’च्या घोषणा खपवून घेतल्या जाणार नाहीत’
हे सगळे विचार साम्यवादी विचारसरणीतून उद्याला आले आहेत
Written by लोकसत्ता टीम

First published on: 12-03-2016 at 14:29 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You cannot demand azadi using the excuse of freedom of speech