न्यायालयांनी हायब्रिड कामकाज सुरू ठेवण्याच्या आवश्यकतेबाबत कायदेविषयक जगतामध्ये सुरू असलेल्या मतभेदा दरम्यान वरिष्ठ वकील फली एस नरीमन यांनी प्रत्यक्षरित्या कामकाजाचे समर्थन केले. लाइव लॉच्या मदतीने इंडियन लॉ इंस्टीट्यूट केरळ यूनिटद्वारे आयोजित एका ऑनलाइन लेक्चरमध्ये नरीमन यांनी सांगितले की, जर आरोग्यविषयक परिस्थिती अनुकल आहे, तर न्यायालयांनी प्रत्यक्ष सुनावणीवर परत आलं पाहिजे. ते ऑनलाइन न्यायालयांची वर्तमान प्रमाली आणि हायब्रिड सुनावणीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांची भूमिका मांडत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यांनी म्हटले की, मी माफी मागू इच्छतो, हे त्या दुर्दैवी महामारीमुळे आहे ज्यामुळे आपण पीडित आहोत. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही मला विचाराल, परिस्थिती चागंली असेल तर निश्चितपणे प्रत्यक्ष सुनावणी व्हायला हवी. त्यांनी सांगितले की, जर व्याख्यान प्रत्यक्षरित्या असतं तर कितीतरी अधिक चांगल्या प्रकारे बोललं आणि ऐकता आलं असतं. पुढे ते म्हणाले, कोणत्याही प्रकारच्या ग्रहणक्षमतेसाठी पूर्णपणे प्रतिकूल असलेल्या माध्यमातून बोलण्याऐवजी प्रत्यक्षरित्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जास्त मजा येईल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young lawyers are in a lot of trouble statement of senior lawyer fali s nariman msr
First published on: 22-10-2021 at 15:09 IST