कर्नाटकमधील मंगळुरु जिल्ह्यात अज्ञातांनी एका २३ वर्षीय तरुणाची गुरुवारी संध्याकाळी हत्या केली. दक्षिण कन्नडमधील भाजपाच्या युवा मोर्चा समितीचे सदस्य प्रवीण नेत्तर यांच्या हत्येनंतर तणाव असतानाच ही हत्या घडली आहे. प्रवीण नेत्तर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. दरम्यान तरुणावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.

“गुरुवारी (२८ जुलै) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास २३ वर्षीय तरुणावर चार ते पाच जणांनी हल्ला केला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता,” अशी माहिती मंगळुरुचे पोलीस आयुक्त एन शशी कुमार यांनी दिली आहे.

भाजपच्या युवा नेत्याची हत्या : दोन संशयितांना अटक

“धारदार शस्त्राने तरुणांच्या टोळीने हल्ला केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर सुरथकलमध्ये जमाबंदीचं १४४ कलम लागू करण्यात आलं आहे,” असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी मुस्लिमांना घरामध्ये नमाज पठण करण्यासाठी विनंती केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “आयुक्तालय हद्दीतील सर्व दारुची दुकानं २९ जुलैला बंद असणार आहेत. आम्ही सर्व मुस्लिम नेत्यांना घरामध्येच नमाज पटण करण्याची विनंती केली आहे. याप्रकरणी लवकरच आरोपींवर कारवाई केली जाईल”. पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं आहे.