You Tube Mother Child Sexual Abuse Content To Be Deleted: YouTube ने सोमवारी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडे (NCPCR) व्हिडीओ काढून टाकण्याच्या मुदतीत वाढ व्हावी यासाठी मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी युट्यूबला ‘आई आणि मुलांचे’ असभ्य कृत्य दाखवणारे व्हिडिओ काढून टाकण्यासाठी बाल हक्क संरक्षण आयोगाने निर्देश दिले होते.

प्राप्त माहितीनुसार, एनसीपीसीआर (NCPCR) ने १० जानेवारी रोजी युट्युबच्या अधिकाऱ्यांना समन्स बजावले होते. युट्युबवर अशा प्रकारचे व्हिडीओ दाखवणाऱ्या चॅनेलच्या यादीसह १५ जानेवारीपर्यंत प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

एनसीपीसीआरने एका निवेदनात, म्हटले आहे की, “YouTube वर ‘बाल लैंगिक शोषण सामग्री’ चा एक चिंताजनक ट्रेंड वाढत आहे, यामध्ये महिला आणि अल्पवयीन मुलांमधील संभाव्य लैंगिक अत्याचाराच्या कृत्यांचे व्हिडीओ दाखवले जात आहेत. या व्हिडिओंच्या प्रेक्षकांमध्ये अल्पवयीन मुलांचा सुद्धा समावेश आहे, ज्यामुळे ही आणखीनच चिंतेची बाब ठरत आहे.

यावर उत्तर देताना, यूट्यूबचे प्रतिनिधी सोमवारी आयोगासमोर हजर झाले, एनसीपीसीआरने सांगितले की, या विषयावर विस्तृत चर्चा झाली आणि यूट्यूबला निर्देशांचे पालन करण्यासाठी २९ जानेवारीपर्यंत वेळ देण्यात आला. यासंदर्भात आता युट्युबने आणखी मुदतवाढ मागितली आहे.

दरम्यान यापूर्वी ऑगस्टमध्ये युट्युबच्या कम्युनिटी गाईडलाईन्सचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतातील सुमारे १९ लाखांपेक्षा अधिक व्हिडीओ हटवण्यात आले होते. हा आकडा इतर कोणत्याही देशात काढलेल्या व्हिडिओंच्या संख्येपेक्षा जास्त आहे. याच कालावधीमध्ये युट्युबने जागतिक स्तरावर कम्युनिटी गाइलाईन्सचे उल्लघंन केल्याप्रकरणी ६४ लाख ८० हजार व्हिडीओ हटवले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे ही वाचा<< ४ वर्षाच्या लेकाच्या खुनाच्या एक आठवडाआधी सूचनाने रचलेला कट झाला उघड; ३१ डिसेंबरला नवऱ्याला सांगितलं..

युट्युबने यापूर्वी कॉन्टेन्टबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना, ”एक कंपनी म्हणून सुरुवातीपासूनच आमच्या कम्युनिटी गाईडलाइन्सनुसार युट्युब वापरकर्त्यांना हानिकारक कॉन्टेन्टपासून संरक्षण दिले आहे. आम्ही मशीन लर्निंग आणि मानवी समीक्षक या दोघांच्या मदतीने आमच्या कम्युनिटी गाईडलाईन्स लागू करतो.”