Diwali 2023 Dhantrayodashi Date and Time : हिंदू धर्मात दिवाळी या सणाला विशेष महत्त्व आहे. दिवाळी हा सण भारतातच नव्हे तर जगभरात उत्साहत साजरा केला जातो. दिवाळी हा सण ५ दिवसांचा असतो. या पाच दिवसामध्ये घरोघरी अगंणात दिवे लावले जातात. आकाशकंदील लावले जातात. दारात रागोंळी काढली जाते. घरात फुलांची आरास करतात. दाराला तोरण बांधतात. घरोघरी फराळ करण्यासाठी मित्र-मैत्रिणींना बोलावले जाते. दिवाळीच्या दिवसांमध्ये सोन्या -चांदीची खरेदी करतात. नवीन वस्तूंची खरेदीदेखील या काळात करतात. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजा, वसूबारस आणि भाऊबीज अशी पाच दिवाळी साजरी केली जाते.

धनत्रयोदशीचे महत्त्व

धनत्रयोदशीपासून दिवाळीला खरी सुरुवात होते. धनत्रयोदशीचा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला असतो. या सणाला धनतेरस म्हणूनही ओळखतात. धनतेरस हा शब्द ‘धन’ आणि ‘तेरस’ या दोन शब्दांपासून बनला आहे. धन संपत्तीचे प्रतिनिधित्व करते आणि तेरस तेरावा दिवस दर्शवितो. पाच दिवसांचा दिवाळी सण अधिकृतपणे या दिवशी सुरू होतो. असे मानले जाते की, या दिवशी समुद्रमंथन किंवा समुद्रमंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी दुधाच्या सागरातून प्रकट झाली.

“आयुर्वेदाचे हिंदू देव, भगवान धन्वंतरीची उत्पत्ती झाल्याकारणाने या दिवशी धन्वंतरीचा जन्मोत्सव साजरा केला जातो.” अशी माहिती पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे यांनी लोकसत्ताला दिली. असे मानले जाते की, भगवान धन्वंतरीची पूजा केल्यास चांगले आरोग्य आणि समृद्धी लाभते.

हेही वाचा – ५९ वर्षांनंतर धनत्रयोदशीला बनतोय दुर्मिळ योग; ‘या’ राशींचे नशीब पालटणार? लक्ष्मी कृपेने अपार धनलाभाची शक्यता

धनत्रयोदशी मुहुर्त

पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा १० नोव्हेंबरला धनत्रयोदशी असून संध्याकाळी ५ : ५५ ते ८:२८ पर्यंत पुजेचा मुहूर्त आहे.

हेही वाचा – Diwali Padwa 2023 : यंदा दिवाळी पाडवा नेमका कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व

कसे केले जाते धनत्रयोदशीचे पूजन?

या दिवशी सोने, चांदी , भांडी खरेदीला विशेष महत्त्व असते. “नवीन भांड्यामध्ये धणे भरून त्याचे पूजन केले जाते आणि दुसऱ्या दिवसापासून ते वापरण्याची प्रथा आहे.

“धनत्रयोदशी दिवशी, कणकेच्या पिठामध्ये हळद घालून दिवा तयार केला जातो आणि तो सायंकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावण्यास सांगितला जातो. त्यामुळे यमाची कृपा होते असे मानले जाते.” असे पं.देशपांडे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय धनत्रयोदशीला लक्ष्मी म्हणून झाडू अथवा केरसुणीची पुजा केली जाते. घरात सुख-शांती येते आणि संपत्ती वाढते असे मानले जाते.