रक्ताचा रंग लाल असतो हे सर्वांनाच माहीत आहे, पण शरीरातील नसा ह्या निळ्या, जांभळ्या किंवा हिरव्या रंगाच्या दिसतात. यावरून अनेकदा तुम्हालाही प्रश्न पडला असेल की असे का असते? रक्त लाल असते, मग नसा हिरवट-निळ्या का दिसतात? त्या हलक्या लाल किंवा केशरी रंगाच्या का नसतात? काही लोकांचा असा समज असतो की, ऑक्सिजन असलेल्या रक्ताचा रंग लाल असतो, तर ऑक्सिजन नसलेले रंग निळे असते. परंतु, हा समज पूर्णपणे खोटा आहे. कारण रक्ताचा रंग हा फक्त नी फक्त लालच असतो. मग नसा हिरव्या निळ्या का दिसतात जाणून घेऊ…

रक्त लाल का असते?

ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या रक्तपेशींमध्ये आढळणाऱ्या हिमोग्लोबिन या प्रोटीनमुळे रक्ताचा रंग लाल असतो. हिमोग्लोबिनमध्ये लोहाचे चार घटक असतात, जे लाल प्रकाश प्रकट करतात; म्हणजेच या घटकांवर जेव्हा प्रकाश पडतो तेव्हा ते प्रकाशातील उर्वरित रंग शोषून घेतात, परंतु लाल रंग शोषून घेत नाही. अशा स्थितीत लाल प्रकाश सर्वांशी टक्कर देत आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतो, त्यामुळे रक्ताचा रंग लाल दिसतो. रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी-जास्त झाल्यास हा लाल रंगही बदलू शकतो.

रक्तात ऑक्सिजनची मोठी भूमिका

जेव्हा हिमोग्लोबिन फुफ्फुसातून ऑक्सिजन घेते तेव्हा रक्ताचा रंग चेरीसारखा लाल होतो. यानंतर हे रक्त धमन्यांमधून प्रवास करत शरीराच्या ऊतींमध्ये पोहोचते. यावर डॉ. क्लेबर फरट्रिन यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा हे रक्त फुफ्फुसातून परत येते तेव्हा नसांमधील हे डी ऑक्सिजनयुक्त रक्त गडद लाल होते.

सोप्या भाषेत सांगायचे तर शरीरातील ऑक्सिजनच्या प्रमाणानुसार रक्ताचा रंग वेगवेगळा असू शकतो. जसे एखाद्याचे रक्त गडद लाल रंगाचे असेल, कोणाचे मध्यम लाल रंगाचे असते तर कोणाचे हलके लाल असते. पण, रक्त प्रत्यक्षात निळे किंवा हिरवे नसते. निळ्या दिसणाऱ्या नसांमधूनही फक्त लाल रंगाचे रक्त बाहेर येते.

नसा हिरव्या-निळ्या का दिसतात?

डॉ. क्लेबर फरट्रिन यांच्या मते, निळ्या किंवा हिरव्या नसा दिसणे हा केवळ एक भ्रम आहे, कारण या नसा त्वचेच्या पातळ थराखाली असतात. आपण जे रंग पाहतो ते रेटिनावर आधारित असतात आणि त्वचेवरील थर वेगवेगळ्या प्रकारे रंग विखुरतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गडद रंगाच्या त्वचेखाली नसा अनेकदा हिरव्या दिसतात, तर त्वचेचा हलका रंग असल्यास नसा निळ्या किंवा जांभळ्या दिसतात. याचे कारण असे की, प्रकाशाची हिरवी आणि निळी तरंगलांबी लाल तरंगलांबीपेक्षा कमी असते; त्यामुळे लाल प्रकाशापेक्षा निळा प्रकाश आपल्या ऊती आणि त्वचेत पटकन प्रवेश करू शकतो. यामुळेच त्वचेवर प्रकाश पडतो तेव्हा आपल्या त्वचेचे विविध स्तर लाल रंग शोषून घेतात आणि निळा किंवा हिरवा रंग परावर्तीत होऊन आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतो.