Laptop हा सध्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचा भाग बनला आहे. आपली ऑफिसची कामे , तसेच इतर अनेक कामे आपण लॅपटॉपवर करत असतो. लॅपटॉपशिवाय आपली कामे होणे जवळजवळ अशक्य झाले आहे. आजकाल बाजारामध्ये अनेक प्रकारच्या साईझमध्ये लॅपटॉप उपलब्ध आहेत. तर, २० हजार रुपयांपासून ते १ ते दीड लाख रुपयांपर्यंतचे अनेक कंपन्यांचे भरपूर मॉडेल्स विक्रीसाठी बाजारामध्ये उपलब्ध आहेत.
मात्र प्रत्येक व्यक्तीलाच नवीन कोरा लॅपटॉप खरेदी करणे शक्य नसते. मात्र त्याला त्याच्या कामासाठी लॅपटॉपची गरज असते. तर आज आपण सेकंडहॅन्ड लॅपटॉप खरेदी करायचा असले तर कोणती काळजी घ्यावी तसेच ती काळजी न घेता सेकंड हॅन्ड लॅपटॉप खरेदी केल्यास काय तोटे होऊ शकतात हे जाणून घेऊयात.
या गोष्टींची काळजी घ्यावी
१. अंतर्गत आणि बाह्य भाग तपासा
जर का तुम्ही सेकंड हॅन्ड लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तो खरेदी करत असताना त्याचे बाहेरील व अंतर्गत पार्ट तपासून घेणे आवश्यक आहे. इंटर्नल पार्टस म्हणजे लॅपटॉपची कनेक्टिव्हीटी तपासून घ्यायला हवी. तसेच बाह्य भाग म्हणजे त्याचा माउस, कीबोर्ड , कॅमेरा असे पार्ट तपासून घेतले पाहिजेत.
२. फीचर्स
कोणताही सेकंड हॅन्ड किंवा नवीन लॅपटॉप खरेदी करत असताना तुम्हाला ज्या कामासाठी लॅपटॉपची गरज आहे ते आधी ठरवले पाहिजे. मग त्यानुसार त्या कामासाठी लागणारे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स त्यामध्ये आहेत का हे तपासले पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला अगदी सामान्य कामासाठी लॅपटॉप हवा असेल तर बेसिक फीचर्स असलेला लॅपटॉप देखील तुम्ही खरेदी करू शकता.
आपण कोणतीही वस्तू ही थोडे-थोडे पैसे जमवून ते साठवून खरेदी करत असतो. मग लॅपटॉपसारखी महागडी वस्तू खरेदी करताना देखील आपण ही काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्ही ज्या ठिकाणाहून लॅपटॉप खरेदी करत आहात त्या शॉपबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. जर ऑनलाईन किंवा ऑफलाईन लॅपटॉप खरेदी करत असाल तर ते अधिकृत असणे आवश्यक आहे. यामुळे तुमच्या लॅपटॉप ला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता.
सेकंड हँड लॅपटॉप घेत असताना त्याची बॅटरी तपासून घेतली पाहिजे. बॅटरी लवकर संपत असेल तर त्या लॅपटॉपचा तुम्हा काही फायदा मिळणार नाही. नेहमी असा लॅपटॉप खरेदी करावा ज्याची बॅटरी १५ मिनिटांच्या वापरानंतर ५० टक्क्यांच्या खाली जात नाही. म्हणजेच लॅपटॉप पूर्णपणे चार्ज झाला तर त्याची बॅटरी नॉर्मल वापराच्या वेळी ८० टक्के इतकी राहिली पाहिजे. सेकंड हॅन्ड लॅपटॉप खरेदी करताना या गोष्टी तपासून घेणे आवश्यक आहे नाहीतर नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणजेच वरील गोष्टी तपासून घेतल्या नाहीत तर त्याचे काही पार्ट्स किंवा बॅटरी खराब असण्याची शक्यता असते. म्हणून सर्व गोष्टी तपासूनच सेकंड हँड लॅपटॉप खरेदी करावा.