Dahi Handi Special Marathi Krishna Story: वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे असं म्हणणाऱ्या संतांच्या भूमीत म्हणजेच आपल्या महाराष्ट्रात झाडं, पानं, फुलं, वेली या सगळ्यांना देवत्व देण्यात आले आहे. निसर्गाला देवता मानून आजही अनेक ठिकाणी विविध सणांच्या निमित्ताने पूजा करत असतात. अगदी ऋतुबदल सुद्धा जिथे आनंदोत्सवासारखे साजरे होतात अशा भूमीतील एक खास कहाणी आज आम्ही आपल्यास सांगणार आहोत. श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतरचा दिवस दही हंडी म्हणून देशभरात साजरा होत असताना आपण कृष्णाच्याच नावावरून ओळखल्या जाणाऱ्या कांद्याची गोष्ट आपण जाणून घेऊया…

इंस्टाग्रामवरील प्रसिद्ध मराठी प्रेमी अकाऊंट खलबत्ता ऑफिशियल यांनी ‘कृष्णावळ’ या शब्दाचा अर्थ कांदा होत असल्याचे सांगितले आहे. कहाणी शब्दांची या पुस्तकात लेखक सदानंद कदम यांनी देखील याबाबत उल्लेख केला आहे. कांद्याला कृष्णाचे स्वरूप मानले जाण्याचे कारणही खूप खास आहे. तुम्ही जर कधी कांदा उभा चिरलात तर तुम्हाला कांद्याच्या दोन्ही तुकड्यांवर शंखाची आकृती दिसेल. (साहजिकच कांद्याच्या आकारानुसार ती आकृती बदलू शकते) आणि हेच जर तुम्ही कांदा आडवा चिरलात तर तुम्हाला दोन्ही बाजूला सुदर्शन चक्रासारखी गोल आकृती दिसेल. शंख व सुदर्शन चक्र दोन्ही गोष्टी या श्रीकृष्णाचे आयुध मानले जातात यामुळेच कांद्याला श्रीकृष्ण स्वरूप मानले जाते.

“उभा कापता कांदा तिथे दिसे आकृती शंखाची…
आडवा कापता कांदा आकृती दिसे सुदर्शन चक्राची…”

हे ही वाचा<< राम राम भाई सारेयाने.. म्हणत हिट झालेलं ‘७५ हार्ड’ चॅलेंज काय आहे? तुम्ही ‘हे’ पाच नियम पाळू शकता का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्ही जर सचिन पिळगावकर यांचा ‘आम्ही सातपुते’ हा चित्रपट पाहिला असेल तर एका गाण्यात सुद्धा हाच संदर्भ सांगण्यात आला आहे. त्यामुळेच गमतीत कांद्याला कृष्णावळ असे म्हटले जाते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा.