Why Moon Visible in Daytime: सध्या सर्वत्र वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणाची चर्चा सुरू आहे. चंद्र, सूर्यमालेचा पाचवा सर्वात मोठा नैसर्गिक उपग्रह, पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे. चंद्रग्रहण महत्त्वाची खगोलशास्त्रीय घटना आहे. या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण आज शनिवारी २८ ऑक्टोबरला शरद पौर्णिमेच्या रात्री दिसणार आहे. हे ग्रहण रात्री ११ वाजून ५ मिनिटांनी सुरू होईल आणि २ वाजून २४ मिनिटांनी संपेल. हे चंद्रग्रहण भारतातील सर्व शहरांमध्ये दिसणार आहे. रात्रीच्या वेळी आकाशात पाहिले असता आपल्याला असंख्य चांदण्या दिसतात. या चमचमणाऱ्या आकाशात चंद्र दिसतो. पण कधी कधी पहाटे अन् संध्याकाळच्या प्रकाशात चंद्र का दिसतो? यामागचं कारण तुम्हाला माहिती आहे का…चला तर जाणून घेऊया खरं कारण…

पहाटे अन् संध्याकाळच्या प्रकाशातही चंद्र का दिसतो?

चंद्र रात्रीच्या आकाशात चमकदारपणे चमकतो आणि सुंदर दिसतो. परंतु चंद्र कधीकधी पहाटे अन् संध्याकाळच्या प्रकाशात का दिसतो? हा प्रश्न अनेकांच्या मनात घर करून राहतो, पण याचं उत्तर अनेकांना मिळत नाही. खरंतर, पहाटे अन् संध्याकाळच्या वेळी चंद्र दिसण्याचे मुख्य कारण म्हणजे सूर्यप्रकाशाची कमतरता आहे .

May 2024 These Five Zodiac Signs Will Earn Money
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
Till 1st June 2024 Mangal Gochar in Meen rashi Mahavisfot Angarak Yog on Hanuman Jayanti
१ जूनपर्यंत मीन राशीत ‘महाविस्फोट अंगारक’ योग; ‘या’ राशींचा भाग्योदय; प्रचंड धनासह प्रत्येक कामात मिळेल गती
Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?

सूर्यप्रकाशाच्या परावर्तनामुळे चंद्र आपल्याला पहाटे अन् संध्याकाळच्या वेळी दिसतो. सोप्या शब्दात समजून घेतल्यास, जेव्हा सूर्यप्रकाश कमी असतो, म्हणजे सूर्य उगवण्याच्या आणि मावळण्याच्या वेळी आपल्याला हा चंद्र दिसतो, म्हणून आपल्याला असा भ्रम होतो की, चंद्र कधी कधी दिवसा उगवतो. याशिवाय कधी कधी सूर्यप्रकाशाअभावी यावेळी चंद्र दिसतो.

(हे ही वाचा : भारतात चंद्राला ‘चंदा मामा’ का म्हणतात? काका, भाऊ, बाबा असं का म्हणत नाही, माहितेय? जाणून घ्या रहस्य )

वैज्ञानिकदृष्ट्या समजून घेतल्यास, काही वायूचे कण आपल्या वातावरणात फिरत राहतात. नायट्रोजन आणि ऑक्सिजन विशिष्ट विखुरलेल्या प्रकाशात, जे निळ्या आणि जांभळ्या रंगाच्या लहान लहरी देखील उत्सर्जित करतात, जे वेगळ्या दिशेने प्रकाश शोषून घेतात आणि पुन्हा उत्सर्जित करतात. अशा स्थितीत आकाशाचा रंग अधिक निळा होतो आणि यावेळी कमी सूर्यप्रकाशामुळे आपल्याला पहाटे अन् संध्याकाळीही चंद्र दिसतो.

पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील एका शास्त्रज्ञाच्या म्हणण्यानुसार, ताऱ्यांचा प्रकाशही खूप जास्त असतो, पण तो चंद्राच्या तुलनेत खूपच कमी असतो, त्यामुळेच दिवसा तारे दिसणे फार कठीण असते. अशा स्थितीत अमावस्येला दिवसभरात कधी कधी चंद्र आपल्याला दिसतो.