Why Dogs Chase Vehicles: अनेकदा तुम्हाला बाईक किंवा कार चालवत असताना कुत्रं मागे लागल्याचा अनुभव आला असेल. (Running dogs behind bike and Car) कुत्रे भुंकायला लागतात आणि वाहनाच्या मागे धावतात. तुम्ही दुचाकी किंवा चारचाकी वाहनाने जात असताना अनेकदा असं होते की कुत्री तुमच्या गाडीच्या मागे धावतात. जोरजोराने भुंकतात. अशावेळी अनेकदा चालकाचं नियंत्रण सुटण्याची शक्यता असते किंवा कुत्रं भुंकल्याने चालकाचे लक्षही विचलित होण्याची शक्यता असते. यामुळे अपघातदेखील होऊ शकतो. असे अनेकदा घडते आणि लोकांच्या मनात एकच प्रश्न पडतो की, कुत्र्याचे गाडीशी शत्रुत्व काय? असाच प्रश्न तुमच्या मनात अनेकदा आला असेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुत्री का भुंकतात किंवा वाहनाच्या मागे का लागतात? याचा विचार करणं गरजेचं आहे. कुत्र्यांच्या या वागण्यामागे अनेक कारणे आहेत आपल्याला ती सर्व समजून घेणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया याचे खरे कारण…

…म्हणून कुत्रे बाईक किंवा कारच्या मागे धावतात

श्वान तज्ज्ञांच्या मते, कुत्रे कोणत्याही वाहनाच्या मागे तुमच्यामुळे धावत नाहीत. वास्तविक, ते गाडीच्या टायरभोवती धावतात, ज्यावर काही कुत्र्याने आपला वास सोडला असतो. वास्तविक, ते इतर कुत्र्यांना आपले शत्रू मानतात आणि जेव्हा त्यांना तुमच्या गाडीच्या टायरमधून दुसऱ्या कुत्र्याचा वास येतो तेव्हा ते त्याच्या मागे भुंकत धावतात. कारण कुत्र्यांना वासाची तीव्र भावना असते, ते टायरवर असलेल्या गंधाचा वास घेऊ शकतात. आता प्रश्न असा आहे की वास कशाचा आहे? तुमच्या लक्षात आले असेल की काही वेळा कुत्रे तुमच्या गाडीच्या टायरवर लघवी करतात. अशा स्थितीत लघवीचा वास इतर कुत्र्यांना गाडीच्या मागे धावायला भाग पाडतो. गंधामुळे कुत्रे गाडीचा पाठलाग करण्यास आणि तिच्यावर भुंकण्यास उद्युक्त होतात.

(हे ही वाचा : पाकिस्तानात कोणत्या कंपनीच्या कारची सर्वाधिक विक्री होते माहितेय कां? नाव बघून तुम्ही व्हाल थक्क! )

…तर कुत्रे तुमच्या बाईक किंवा कारच्या मागे धावणार नाहीत

तुमच्या गाडीच्या टायरवर जर कुत्र्याने लघवी केली नसेल आणि वास येत नसेल तर इतर कुत्रे गाडीच्या मागे धावणार नाहीत हेही इथे लक्षात घेण्यासारखे आहे. वास्तविक, कुत्र्यांना प्रदेश असतो. एखाद्या भागात नवीन कुत्रा आला की तेथील कुत्रे त्याचा पाठलाग करतात. अशा परिस्थितीत जेव्हा गाडी येते आणि कुत्र्याचा वास येतो तेव्हा तिथे राहणाऱ्या कुत्र्यांना वाटते की, आपल्या परिसरात नवीन कुत्रा येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुत्रे आपला बचाव कसा कराल?

जर तुमच्यासोबत असे काही घडले आणि कुत्रे तुमच्या गाडीवर भुंकत असतील तर तुम्ही घाबरू नका. यावरचा सर्वात पहिला उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या वाहनाचा वेग कमी करा. यामुळे काय होईल की, अनेकदा कुत्री असं केल्यावर भुंकणं बंद करतात. तसंच तुमच्यामागे धावणंही बंद करतात. हिंमतीने आपले वाहन थांबवा. तुम्ही पाहाल कुत्री आपोआप शांत झाली असतील. ते शांत झाल्यावर मग हळूहळू तुमच्या वाहनाचा वेग वाढवा आणि या भागातून बाहेर पडा.