Watermelon: कलिंगड, उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त पंसती दिले जाणाऱ्यांपैकी एक. कलिंगड खाण्याचे आरोग्यासाठी फायदे आहेत हे तुम्हाला माहित आहेत. पण तुम्हाला माहितीये का आता कलिंगडाच रंग फक्त लाल नव्हे तर पिवळा देखील असतो. तुम्हाला कदाचित यावर विश्वास बसत नसेल पण तुम्ही ऐकताय ते सत्य आहे. तुम्ही आतापर्यंत बाजारात उपलब्ध वेगवेगळ्या प्रकारचे कलिंगड खाल्ले असतील. कधी एखादे कमी गोड असते कधी ते फार गोड असते, काही कलिंगडांमध्ये पाणी रस कमी किंवा जास्त असतो. पण नव्या जातीचे पिवळं कलिंगड गेल्या काही वर्षांपासून बाजारात उपलब्ध आहे. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की या कलिंगडाचा रंग पिवळा कसा का आहे?

डेजर्ट किंग आहे पिवळं कलिंगड

लाल कलिंगड हे ५ हजार वर्षांपूर्वी सापडले होते आणि 1,000 वर्षांनंतर पिवळ्या कलिंगडाचे बी सापडले. हे डेजर्ट किंगच्या नावाने ओळखले जाते. कारण हे बहूतेकदा वाळवंटी क्षेत्रामध्ये आढळते जिथे पाण्याची कमतरता असते.

दोन्हींमध्ये काय आहे फरक?

कलिंगडाचे नाव ऐकताचं, आपल्या डोळ्यासमोर लाल रंगाचे रसरशीत कलिंकड येतं पण विशेष म्हणजे बाजारात आहा फक्त लाल नव्हे तर पिवळ्या रंगाचं कलिंगड देखील उपलब्ध आहे. या कलिंगडाचा आतील गर पिवळ्या रंगाचा असतो. लाल कलिंगडाप्रमाणेच पिवळे कलिगंड देखील गोड असते. पण काही बाबतीत हे थोडे वेगळे आहे.

कलिंगडाचा रंग पिवळा रंग का असतो ?

दोघांमधील फरकाचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यात असलेले रसायन. यामध्ये एक रसायन आहे जे ठरवते की कलिगंडाचा कोणता रंग असेल. लाल की पिवळा? विज्ञानानुसार, हे लाइकोपीन नावाचे रसायन आहे, ज्यामुळे या कलिंगडामध्ये फरक पडतो. हे रसायन लाल कलिंगडाध्ये असते, परंतु पिवळ्या कलिंगडमध्ये नसते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इतर फरक

आता रंगाव्यतिरिक्त दोघांमध्ये काय फरक आहेत ते समजून घेऊ. पिवळे कलिंगड हे लाल रंगापेक्षा किंचित गोड असते आणि त्यात अ आणि क जीवनसत्त्वे पुरेशा प्रमाणात असतात. दोनपैकी, पिवळे कलिंगड चांगले मानले जाते, कारण त्यात लाल रंगापेक्षा जास्त अँटीऑक्सिडंट्स आणि बीटा-कॅरोटीन असतात. बीटा कॅरोटीनमुळे कर्करोग आणि डोळ्यांच्या आजारांचा धोका कमी होतो.