काहीतरी गौडबंगाल आहे असं वाक्य अनेकदा आपल्या कानांवर पडतं. गौडबंगाल हा शब्द आपल्याला बऱ्याच काळापासून परिचित आहे. बातम्यांमध्येही हा शब्द आपण अनेकदा वाचला आहे. कथांमधून, लेखांमधून या शब्दाचा परिचय आपल्याला झाला आहे. गौडबंगाल या शब्दाचा अर्थ काय आपण समजून घेऊ?

गौडबंगाल म्हणजे काय?

एक काळ असा होता की आपला देश हा जादूटोण्याचा देश म्हणून ओळखला जात असे. मध्यबंगाल ते ओरिसा हा प्रांत गौड प्रांत म्हणून ओळखला जात होता. कारण हा संपूर्ण प्रांत काळ्या जादूसाठी ओळखला जात असे. जादू हा शब्द उच्चारला की अनेकांना आजही बंगाली जादू आठवते. त्यावेळी देशात कुठेही वेगळी किंवा गूढ घटना घडली तर ती गौड किंवा बंगाली लोकांनीच केलेली करामत असावी असा समज अनेकदा व्हायचा. त्यावरुन अद्भुत, चमत्कारीक गूढ घटनेमागे गौडबंगाल आहे असं म्हटलं जाऊ लागलं. त्यामुळेच हा शब्द अस्तित्वात आला गौडबंगाल. आजही तो वापरला जातोच हे विशेष.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठी भाषेत काही शब्द फारसी भाषेतून आले आहेत. तर काही शब्द संस्कृत भाषेतून आले आहेत. तर गौडबंगाल हा शब्द चक्क एका प्रांतावरुन आला आहे. ‘कहाणी शब्दांची’ मराठी भाषेच्या जडणघडणीची या सदानंद कदम यांनी लिहिलेल्या पुस्तकात हा अर्थ देण्यात आला आहे. त्यामुळे आता तुम्ही जर कुठे गौडबंगाल असा शब्द वाचलात तर तुम्हाला तो शब्द प्रांतवरुन आला आहे हे कुणालाही सहज सांगता येईल.