February सध्या इंग्रजी कॅलेंडरनुसार फेब्रुवारी महिना सुरु आहे. या महिन्याला हे नाव कसं मिळालं हे तुम्हाला माहीत आहे का? फेब्रुवारी महिन्याला फेब्रुवारी हे नाव मिळण्यामागे एक खास गोष्ट आहे. आपण जाणून घेऊ नेमकं काय कारण आहे.

फेब्रुवारी आहे वर्षातला सर्वात छोटा महिना

फेब्रुवारी हा वर्षातला सर्वात छोटा महिना आहे. कारण या महिन्याला २८ दिवसच असतात. शिवाय लीप इयर असेल तर या महिन्याला २९ दिवस असतात. मात्र फेब्रुवारी हे नाव या महिन्याला येण्यामागे एक खास कारण आहे. दिनदर्शिकेशी संबंधित इतिहास हे सांगतो की मूळ रोमन दिनदर्शिकेत फक्त १० महिने होते. मग रोमच्या राजाने यात बदल केला.

फेब्रुवारी महिन्याचा इतिहास काय?

ख्रिस्तपूर्व ७०० च्या दशकात रोमचा दुसरा राजा नुमा पॉम्पिलियस याने त्यात बदल केला. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी हे अनुसरुन त्याने जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची भर घातली. हे दोन्ही महिने त्या काळात २८ दिवसांचे होते. जानेवारीत कालांतराने ३१ दिवस आले मात्र फेब्रुवारी महिना २८ दिवसांचाच राहिला. जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने दिनदर्शिकेत येण्यापूर्वी १ मार्च हा वर्षाचा पहिला दिवस होता. इसवीसन पूर्व १५३ मध्ये वर्षाची सुरुवात १ जानेवारी पासून होऊ लागली.

फेब्रुआ या खास उत्सवावरुन पडलं आहे फेब्रुवारी हे नाव

जानेवारी आणि इतर महिन्यांची नावं ही रोमन देवतांच्या नावावर आधारित आहेत. फेब्रुवारी हे नाव मात्र रोमन देवता फेब्रुअसच्या नावावरुन ठेवलं गेलेलं नहाी. फेब्रुआ नावाचा सण साजरा होत होता. त्यावेळी लोकांनी शुद्धी व्हावी म्हणून स्नान करत असत फेब्रुआ या सणाच्या नावावरुन फेब्रुवारी हा महिना झाला आणि महत्त्वाची बाब म्हणजे फेब्रुअस या देवतेचं नाव फेब्रुआ या खास उत्सवावरुन ठेवण्यात आलं. तेव्हापासून आपल्याला फेब्रुवारी हा महिना म्हणून मिळाला.

News About How February Get Its Name?
फेब्रुवारी महिन्याला हे नाव कसं मिळालं? (फोटो-फेसबुक )

सध्या आपण जे बारा महिन्यांचं कॅलेंडर वापरतो ते ग्रेगोरियन आहे

ग्रेगोरी या धर्मगुरूने ज्युलियन कॅलेंडरमध्ये पुढे आणखी सुधारणा केल्या. आज आपण हे ग्रेगोरियन कॅलेंडर वापरतो. त्याने ३६५ दिवसांना १२ महिन्यात बसवलं तरी सौर वर्षाचा पाव दिवस उरतो. म्हणून ज्युलियस सीझरने दर चार वर्षांनी एक जादा दिवस फेब्रुवारीला बहाल केला. या वर्षी जरी फेब्रुवारी २८ दिवसांचा असला, तर तो आणखी चार वर्षांनी येणार्‍या २०२९ च्या लीप वर्षात फेब्रुवारी महिना २९ दिवसांचा असेल. या लीप दिवशी वाढदिवस असणारे तो मोठ्या झोकात साजरा करतात. dictionary.com ने हे वृत्त दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फेब्रुवारी महिन्याची खासियत काय?

फेब्रुवारीचे २८ दिवस म्हणजे पूर्ण चार आठवडे होत असल्याने एक फेब्रुवारीला जो वार येतो, तोच वार एक मार्चला येतो. उत्तरेकडच्या प्रांतात फेब्रुवारीत बर्फ कधी वितळतो आणि पुन्हा बर्फात रूपांतर होतो. असे लहानमोठे बर्फकण मोत्यांसारखे दिसतात म्हणून फिनीश भाषेत फेब्रुवारीला हेल्मिकू अर्थात मोत्यांचा महिना असं नाव आहे.