नवीन वर्षाच्या स्वागताला आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. २०२३ वर्षाला निरोप देत नव्या २०२४ वर्षाच्या स्वागतासाठी लोक सज्ज झाले आहेत. नवं वर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. आता पार्टी म्हटलं की यामध्ये अनेकजण ड्रिंक्सदेखील करत असतात. काही जण बाहेर जाऊन नववर्षाचं स्वागत करतात, तर काही जण घरातच पार्टीचे आयोजन करतात. नववर्षाच्या स्वागतासाठी तुम्हीसुद्धा घरात पार्टीचे आयोजन करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.

हेही वाचा- घोडा खरंच उभ्या-उभ्या झोप काढतो? काय आहे नेमकं या मागचं कारण?

जर तुम्ही पार्टीनिमित्त घरात दारू आणत असाल तर यासाठी तुम्हाला काही नियमांचं पालन करावे लागेल. घरात आपण किती दारू ठेऊ शकतो, यासाठी प्रत्येक राज्यात वेगवेगळे नियम बनवण्यात आले आहेत. प्रत्येक राज्याच्या अबकारी धोरणाच्या आधारे घरात किती दारू साठवून ठेवता येते, याचे प्रमाण ठरवून देण्यात आले आहे. त्यामुळे पार्टी करताना आपल्या घरात आपण किती दारू ठेवू शकतो, त्याचे नियम काय आहेत जाणून घ्या….

दिल्लीत घरांमध्ये किती दारू ठेवायची परवानगी

दिल्ली उच्च न्यायालयाच्या नियमांनुसार तुम्हाला घरामध्ये दारू ठेवण्याची परवानगी आहे. दिल्लीबद्दल सांगायचे तर तुमचे वय २५ वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही नऊ लिटर व्हिस्की, रम किंवा वोडका घरी ठेवू शकता. याशिवाय दिल्लीतील लोक १८ लिटर बिअर किंवा वाईन त्यांच्या घरात ठेवू शकतात.

हेही वाचा- लग्नाचा बस्ता म्हणजे नेमकं काय? ऐंशी वर्षांची परंपरा अन् काळानुसार बदलेला ट्रेंड; जाणून घ्या इतिहास…

पंजाब व हरियाणामध्ये घरांमध्ये किती दारू साठवली जाऊ शकते.

जर तुम्ही पंजाबमध्ये नवीन वर्षाची पार्टी आयोजित करत असाल तर तुम्ही देशी किंवा विदेशी दारूच्या फक्त दोन बाटल्या घरी ठेवू शकता. यापेक्षा जास्त दारू घरी ठेवल्यास दरवर्षी एक हजार रुपये शुल्क भरून परवाना घ्यावा लागेल. हरियाणामध्ये देशी दारूच्या सहा बाटल्या आणि विदेशी दारूच्या १८ बाटल्या घरात ठेवता येतात. यापेक्षा जास्त दारू साठवायची असेल तर २०० रुपये मासिक शुल्क भरून परवाना घ्यावा लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रात काय आहेत नियम

गोव्यासारख्या राज्यात मोठ्या प्रमाणात पार्ट्या होतात. भारतीयांबरोबच अनेक परदेशी लोक नववर्षाच्या स्वागतासाठी खास गोव्यात येतात. गोव्यात तुम्ही १८ बिअरच्या बाटल्या घरी ठेवू शकता. याशिवाय देशी दारूच्या २४ बाटल्या ठेवता येतात. महाराष्ट्राबाबत बोलायचे झाले तर इथल्या घरात दारूच्या ६ बाटल्या ठेवता येतात. राजस्थानसारख्या राज्यात आयएमएफएलच्या १८ बाटल्या घरात ठेवता येतात.