विमान प्रवासादरम्यान त्यातल्या यंत्रणेविषयी आपल्याला अनेकदा कुतूहल वाटते. इतक्या उंचीवर प्रवाशांना ऑक्सिजन कसा मिळतो? त्यासाठी वेगळी सुविधा केली जाते का असे प्रश्न आपल्याला अनेकदा पडतात. विमानात ऑक्सिजन कसा मिळतो जाणून घ्या.

आपण जमिनीपासून जसजसे उंचावर जातो तसतसे हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत जाते, यामुळे अनेकांना उंचावर गेल्यावर श्वास घेण्यास त्रास होतो किंवा दम लागतो. याचा अनुभव बऱ्याच वेळा आला असेल. पण विमानात प्रवास करताना जमिनीपासून प्रचंड उंचीवर असुनही ऑक्सिजनची कमतरता जाणवत नाही, यामागचे कारण म्हणजे विमानात प्रवासादरम्यान प्रवाशांना वातावरणात उपलब्ध ऑक्सिजनचा पुरवढा मुबलक प्रमाणात होतो. इमरजन्सीसाठी वेगळी व्यवस्था देखील करण्यात येते.

आणखी वाचा: औषधांच्या पाकिटावर लाल रेष का असते? जाणून घ्या यामागचे महत्त्वाचे कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जमिनीवर उपलब्ध असणारा ऑक्सिजन आणि विमान प्रवासादरम्यान इतक्या उंचीवर उपलब्ध असणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण सारखे नसते. त्यामुळे प्रवाशांना याचा त्रास होऊ नये यासाठी विमानात एक यंत्रणा असते. ज्याद्वारे वातावरणातील उपलब्ध ऑक्सिजनचा पुरवढा प्रवाशांना केला जातो. त्यामुळे प्रवाशांना विमान प्रवासादरम्यान ऑक्सिजनची कमतरता जाणवत नाही आणि कोणताही त्रास होत नाही.