Paytm Postpaid Buy Now Pay Later: IRCTCने सुरू केलेल्या एका नवीन सुविधेला खूप पंसती मिळत आहे. कित्येकदा तिकीट बुक करायचे असते पण आपल्याकडे पूर्ण पैसे नसतात. अशावेळी आपली फार अडचण होते आणि काय करावे हे समजत नाही. जर तुमच्यासोबत असे काही झाले असेल तर आज जी पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती तुम्हाला नक्की आवडेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

IRCTC आणि Paytm Postpaidचे नवीन सुविधा
पेमेंट करताना त्वरित पैसे न भरता देखील तिकिट बुक करण्याचा एक पर्याय दिला आहे. याचे नाव Buy Now, Pay Later आहे. IRCTCच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. जर तुम्ही आपले तिकीट बुक करण्यासाठी Paytm Postpaid चा वापर करु शकता. तुम्ही ३० दिवसांसाठी उधार म्हणून ६०,००० रुपयांचा वापर करु शकता. त्यामार्फत त्वरित पैसे न भरता ट्रेन तिकीट बुक करु शकता. जेव्हा बिल तयार होईल तेव्हा पैसे भरावे लागतील.

हेही वाचा – मॅग्निफायिंग ग्लासची जादू! कलाकाराने लाकूड जाळून केली कलाकारी, Virat Kohliचे रेखाटले चित्र, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क!

याप्रमाणे Paytm Postpaidने करु शकता ट्रेन तिकीट बुक करा
१. आपण मोबाइलवर IRCTC अॅप डाऊनलोड करा आणि लॉग इन करा.
२. आपल्या प्रवासाची माहिती टाका, त्यामध्ये स्टेशनची माहितीसह तारीख टाका
३. जेव्हा ट्रेन सिलेक्ट करा आणि तिकीट बुक करण्यासाठी पुढे जा
४. आता पेमेंट विंडोवर पोहचल्यानंतर तुम्हाला Buy Now, Pay Later निवडावे
५. Paytm Postpaid वर क्लिक करा आणि आपल्या Paytmचे लॉग इनची माहिती टाका
५. क्रेंडिशिअल टाका, आपल्या एक व्हेरिफिकशन एसएमएस प्राप्त होईल
६. बुकिंगसाठी कन्फर्म करण्यासाठी ओटीपी टाका.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to book confirm train ticket without paying money instantly snk
First published on: 13-05-2023 at 20:00 IST