सध्याच्या घडीला स्मार्ट फोन हा आपल्या रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. आपण सगळेच रोज मोबाइलवर बराच वेळ घालवतो. कामानिमित्त, मनोरंजन म्हणून, व्हॉट्स अॅपचे मेसेज पाहण्यासाठी असे अनेक उपयोग केले जातात. मोबाइलवरचे विविध अॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम या सगळ्यामध्ये आपला किती वेळ जातो कळत नाही. मात्र हाच वेळ आपण किती प्रमाणात घालवला आहे? हे जाणून घेण्याची एक पद्धत आता समोर आली आहे.

कसा मोजाल स्क्रीन टाइम?

अनेक स्मार्ट फोनमध्ये इन बिल्ट फिचर असतं. ज्यात तुम्ही वर्षभर किती काळ फोन पाहिलात, स्क्रिन टाइम किती होता? हे सगळं पाहता येतं. अँड्रॉईड फोन असो किंवा मग आयफोन दोहोंमध्ये Digital Wellbeing आणि Screen Time असे फिचर्स आहेत. या दोन्ही फिचर्समध्ये तुम्ही रोज, आठवडाभर, महिनाभर किंवा वर्षभर किती वेळ कुठल्या अॅपला दिला ते तपासू शकता. कुठल्या अॅपवर किती वेळ घालवला हे देखील दिसून येतं.

गुगल आणि अॅपलचे अहवाल

गुगल आणि अॅपलकडून युजर्सना तुम्ही किती डेटा वापरला, किती वेळ कुठल्या अॅपवर होतात यासंदर्भातले अलर्ट पाठवले जातात. नोटिफिकेशनच्या द्वारे डिजिटल वेलबीईंगचे रिपोर्ट दिले जातात. यामध्ये वर्षभराचा अहवाल असतो ज्याद्वारे तुम्ही जाणून घेऊ शकता की वर्षभर तुम्ही किती वेळ स्क्रीन टाइम म्हणून घालवला आणि कुठल्या अॅपला किती वेळ दिला?

अॅपद्वारे मिळणार वर्षभराचा डाटा

थर्ड पार्टी APP चा उपयोग करुन वर्षभराचा डेटा किती होता, स्क्रीन टाइम किती होता? हे सगळं समजतं. तुम्ही किती वेळा फोन लॉक-अनलॉक केला याचीही माहिती मिळते. तुम्ही Timewise Year Wrapped च्या रिपोर्टरचा उपयोग करुन ही माहिती मिळवू शकता. हे अॅप डाऊनलोड करुन तुम्ही फोनचा किती डेटा, कुठलं अॅप, किती वेळा फोन लॉक अनलॉक केला ही सगळी माहिती मिळवू शकता. या पद्धतीद्वारे तुम्ही किती वेळ स्क्रीन टाइम मोबाइल फोनवर घालवला हे जाणून घेऊ शकता. सात दिवस, पंधरवडा, महिना, सहा महिने आणि एक वर्ष अशी सगळी माहिती या अहवालांद्वारे मिळवता येते.