आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही एक कप चहाने होते. टेन्शन ते गप्पा.. अनेकांना यावेळी एक कप चहाची गरज असते. यामुळे चहा जगातील दुसरे सर्वात लोकप्रिय पेय आहे. दिवसातून कितीही वेळी चहा दिली तरी तो पिणार एक तरी चहाप्रेमी अनेकांच्या घरात असतो. पण हल्ली अनेकांच्या घरात ग्रीन टी किंवा ब्लॅक टीचा वापर वाढत आहे. यासाठी अगदी हॉटेलमध्येही टी बॅगची मागणी वाढतेय. पण तुम्हाला माहिती आहे का, या टी बॅगचा वापर केवळ चहा बनवण्यासाठीच नाहीत घरातील तेलकट भांडी चकाचक करण्यासाठीही केला जाऊ शकतो. त्यामुळे टी बॅगने भांडी कशी स्वच्छ केली जाऊ शकतात जाणून घेऊ…
चहा पिण्यासाठी चांगल्या वेळीची गरज नसते, तर वेळेला चहाची गरज असते. अगदी दुपारी, रात्री कधीही चहा पिण्याचा मोह होऊ शकतो. यात जगातील सर्वाधिक चहा पिणाऱ्यांची संख्या एकट्या तुर्कस्तानमध्ये आहे. तर आयर्लंड आणि युनायटेड किंगडम चहा पिण्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. बहुतेक देशांमध्ये चहापेक्षा जास्त कॉपीला जास्त मागणी. पण त्यादृष्टीने यूके अगदी वेगळा आहे. कारण इथे कॉफीचा वापर चहाच्या वापरापेक्षा खूपच कमी आहे. यात भारतातही चहाप्रेमींची कमी नाही. त्यामुळे चहा जगभरात लोकप्रिय आहेचं, पण त्याच्या प्रकारात आता वेगळापणा आला आहे. हल्ली अधिकाधिक लोक ग्रीन टी किंवा फ्लेवर्ड टीची निवड करतात, कारण ग्रीन टीमध्ये कॅफीनचे प्रमाण कमी असते.
निरोगी आरोग्यासाठी ग्री टी वापर केला जातो. कारण ग्रीन टीमध्ये अनेक अँटिऑक्सिडंट घटक असतात जे तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात. तसेच कोलेस्टेरॉल प्रमाण नियंत्रित करण्यास लठ्ठपणा कमी करण्यास मदत करतात. याशिवाय कॅन्सर, अल्झायमर सारख्या आजारांसाठी ग्रीन टी फायदेशीर मानली जाते.
बण चहाचे या व्यतिरिक्त इतरही अनेक फायदे आहेत. तुम्हाला माहीत आहे का, वनस्पतींसाठी देखील चहा पावडर एक खताचे काम करते. यामुळे चहा पिऊन झाल्यानंतर उरलेली चहा पावडर फेकून न देता ती स्वच्छ धुवून गाळून थंड करा आणि झाडांच्या मुळाशी टाका. यामुळे झाडांना सनबर्नपासून थोडा आराम मिळतो. तसेच झाडांना इतर बुरशीजन्य रोग होत नाही.
चहाचे हे उत्तम फायदे आपण वाचले पण यापासून सिंकमधील तेलकट भांडी कशी स्वच्छ करायची जाणून घेऊ…
बहुतेकजण टी बॅक वापरून झाली की फेकून देतात. परंतु पुढील माहिती वाचल्यानंतर तुम्ही वापरलेली टी बॅग कधी फेकून देणार नाही. ज्यांच्याकडे डिशवॉश नाही त्यांच्यासाठी हा उपाय कामी येणार आहे. भांड्यावरील तेलकटपणा घालवण्यासाठी टी बॅगचा योग्य उपयोग केला जातो. कारण टी बॅगमधील पावडरमुळे भांड्यांवरील तेलकटपणा चांगल्याप्रकारे निघतो. ज्यामुळे भांडी स्वच्छ करणे खूप सोपे होते.
भांडी वापल्यानंतर ती लगेलच घासली तर ती पटकन स्वच्छ होतात. पण कामाच्या धावपळीत नेहमीचं असं करण जमत नाही. यासाठी एकतर वेळ नसतो किंवा इच्छा नसते. यामुळे भांडी वापरल्यानंतर ती लगेच घासण्याचा कंटाळा येत असेल तर ती सिंकमध्ये पाणी टाकून भिजत ठेवू शकता. यात तर तुम्ही दोन टी बॅग टाकलात तर दुसऱ्या दिवशी काम अधिकचं सोप्प होईल. कारण टी बॅग भांड्यामधील तेलकटपणा शोषून घेतात.
भांडी स्वच्छ करण्यासाठी असा करा टी बॅगचा वापर
भांडी खूप तेलकट असली तर सिंक गरम पाण्याने भरा आणि त्यात ही भांडी भिजत ठेवा. पाण्याने भरलेल्या सिंकमध्ये तीन टी बॅग अडकवा आणि रात्रभर तसचं राहू द्या. यामुळे दुसऱ्या दिवशी तुम्हीला भांडी साफ करणे खूप सोपे होईल. टी बॅगमुळे भांड्यांवरील तेलकटपणा कमी होतो. त्यामुळे तुम्हालाही कधी तेलटक भांडी स्वच्छ आणि चकाचक करायची असली तर टी बॅगचा अशाप्रकारे वापर करू शकता.